Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : 'उनके इरादों में गड़बड़ है'; खासदार लंकेंचा विखे पिता-पुत्रावर निशाणा

Sharad Pawar MP Nilesh Lanke Accuses BJP Minister Radhakrishna Vikhe of Moving Ahilyanagar Medical College to Shirdi : अहिल्यानगर जिल्ह्याला मंजूर वैद्यकीय महाविद्यालयावरून खासदार नीलेश लंके यांची पत्रकार परिषद झाली.
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe
Nilesh Lanke On Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Medical College controversy : केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी इथं नेण्याचा घाट घातला जात असून त्यास आपण तीव्र विरोध करू, असे सांगतानाच यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या छुप्या इराद्यांविरोधात राजकीय संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी दिला.

वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अहिल्यानगर इथंच व्हावं, अशी मागणीवर आपण ठाम असून यासाठी वेळप्रसंगी आंदोलन उभारू, असेही खासदार लंके यांनी म्हटले.

खासदार लंके म्हणाले, "अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, यासाठी आपण लोकसभा निवडणुकीनंतर प्राधान्य दिले. 23 ऑगस्टला आपण या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारला पहिले पत्र दिले. त्यानंतरही पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह केंद्रीय शिक्षा मंत्री धमेंद्र प्रसाद, मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यातून या मागणीला यश आले".

मंजूर वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर व्हावे, अशी आमची सुरुवातीपासून मागणी आहे. आपण कोणत्या तालुक्यात राहतो, यापेक्षा जिल्हा महत्वाचा असतो. आज प्रत्येक आमदार, खासदार यांना आपल्याच तालुक्यात हे महाविद्यालय सुरू झाले पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे, असेही खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले.

Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe
Beed political BJP And NCP : अजितदादांच्या बीड दौऱ्यात मोठी घडामोड; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे...

अहिल्यानगर शहरालगत हे महाविद्यालय व्हावे यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन व्यक्तींची कमिटी जिल्ह्यात येऊन गेली आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ व्हावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह कमिटीलाही पत्रव्यवहार करणार आहोत. या महाविद्यालयासाठी 25 ते 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe
Suresh Dhas CM meeting : अजितदादांची 'पकड' नाही? सुरेश धस यांना देखील भरोसा नाय; मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या मुंबईत बैठक

एखाद्याच्या अट्टहासापायी हे महाविद्यालय एखाद्या तालुक्यात जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना, तुमची भूमिका सर्वसमावेशक असली पाहिजे. जिल्ह्याच्या हिताचा विचार केला पाहिजे, असा सल्ला देखील खासदार लंकेंनी दिला. कामगार हॉस्पिटललाही मंजुरी मिळविली असून हे हॉस्पिटलही अहिल्यानगर शहराच्या परिसरातच व्हावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी निंबळक इथं जागा सुचविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

CM फडणवीसांनी घातलंय लक्ष

काळाची पावले माझ्या लक्षात येतात. हे वैद्यकीय महाविद्यालय एका विशिष्ट भागात नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. किंवा होत आहे. सत्तेचा गैरवापर करून तोंडी सूचना दिल्या जाऊ शकतात, असा टोला मंत्री विखेंचे नाव न घेता खासदार लंकेंनी लगावला. तसेच विमानतळ शिर्डीला नेण्यात आले. उद्या हे महाविद्यालयही शिर्डीला जाऊ नये. कारण शिर्डी इथं साईबाबा संस्थानचे मोठे हॉस्पिटल आहे. शिर्डीबाबत माझे दुमत नाही. परंतु शिर्डी एका कोपऱ्याला पडते. अहिल्यानगर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अहिल्यानगर शहरालगत हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास सांगितल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

संसदेत प्रश्न नेला

वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी त्यांची इच्छाशक्ती नव्हती, असे माजी खासदार सुजय विखेंचे नाव न घेता, या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कोणत्या खासदाराने वैद्यकीय महाविद्यालयाचा संसदेत प्रश्न उपस्थित केला नाही. आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विविध मंत्र्यांच्या भेटी घेत संसदेत मुद्दा लावून धरल्याचे खासदार लंकेंनी सांगितला. एका बाजूला वैद्यकीय महाविद्यालय घेऊन जाण्यामागे नेमका काय हेतू आहे? याचा उलगडा करावा, असे आव्हान देखील खासदार लंकेंनी दिले.

मंत्री विखेंवर गंभीर आरोप

अहिल्यानगर दक्षिणमधील अनेक प्रकल्प उत्तरेकडे नेले जात आहेत. याचा अर्थ दक्षिणेतील पुढारी कुठेतरी कमी पडतात, हे वैद्यकीय महाविद्यालय साईबाबा ट्रस्टच्या हॉस्पिटलला जोडून तात्काळ सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याची आपल्याकडे माहिती आहे. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली महाविद्यालय शिर्डीला नेऊन तिकडेच ठेवण्याचा हा डाव आहे, असा गंभीर आरोप खासदार लंकेंनी मंत्री विखेंवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com