नव्या वर्षात छगन भुजबळांनी नाशिकला दिले `हेल्दी` गिफ्ट!

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : नाशिकला (Nashik) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व राज्य शासनातर्फे (Mahavikas Aghadi Government) पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी महिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal</p></div>
तहसीलदारांच्या आपुलकीने `त्या` ज्येष्ठाने आत्महत्येचा विचार सोडला!

कोरोना आढावा बैठकीनंतर श्री. भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव आदींसह विविध विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की राज्य शासन आणि आरोग्य विद्यापीठ यांच्यात ६० : ४० अशा आर्थिक जबाबदारीतून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत होईल. त्यात, बालरोग, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, भूल वैद्यक, आपत्कालीन वैद्यक यांसह साधारण सात विषयांच्या एमडी, एमएस अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली असून, त्यासाठी प्रवेश दिले जातील. त्यासाठी ४९ अभ्यासक्रमांसठी शिक्षकांची नेमणूक होईल, असेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal</p></div>
राष्ट्रवादीवासी भाजप नगरसेवकांमागे लागला अपात्रतेचा ससेमीरा!

६७० कोटींचा प्रस्ताव

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे इमारतीच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून, महिनाभरात प्रक्रियेला गती येऊन बांधकाम सुरू होईल, असे नियोजन आहे. साधारण ६७० कोटींचा वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे, असेही श्री. भुजबळ यांनी या वेळी स्‍पष्ट केले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com