Nilesh Lanke: I can talk English, I can walk English; मी आता इंग्रजीत फडाफडा बोलत असतो!

Nilesh Lanke on Sujay Vikhe: नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी लंकेंना दिले.
Nilesh Lanke on Sujay Vikhe:
Nilesh Lanke on Sujay Vikhe:Sarkarnama

Pune: अहमदनगरमधील सुजय विखे नीलेश लंकेमधील 'फाइट' निकाली लागली आणि विखेंचा पाडाव करून लंके खासदार झाले. ही शर्यत जिंकलेल्या लंकेंनी आता प्रचारातील मुद्दे उकरून काढून विखेंना हिणवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोच्या फैरीत इंग्रजी बोलण्याचा मुद्दा पुढे आला होता.

लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलून दाखावे, असे चॅलेंज करून विखेंनी प्रचार भलतीकडेच नेला होता. मात्र, खासदार होताच, लंकेंनी खास शैलीत विखेंना सुनावले असून, 'मी आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत फडाफडा बोलत असतो, ' अशा नगरी स्टाइलमध्ये सांगून टाकले. त्यामुळे लंके आता इंग्रजी स्पीकिंग क्लासेस लावणार का आणि त्यांचा इंग्रजीचा मास्तर कोण असेन याकडे लक्ष राहणार आहे.

नगरमध्ये इंग्रजी बोलणे हा प्रमुख मुद्दा प्रचारात गाजला. सुजय विखे यांनी नीलेश लंके यांनी त्यांच्या भाषेवरून डिवचलं होते. प्रचारात विखे-लंके यांच्यात इंग्रजीवरुन कलगीतुरा रंगला होता. नीलेश लंकेंनी विजयाचा गुलाल उधळताच विखेंना सुनावलं.

"नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही," असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी (Sujay Vikhe)लंकेंना दिले होते.

आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार असल्याचे लंके म्हणाले. लंकेच्या विधाननंतर 1982 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'नमकहराम'चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवला. इंग्रजी ही मजेशीर भाषा आहे. I can talk English, I can walk English,'हा 'बीग बी'चा संवाद खूप गाजला. त्यांची आठवण लंकेच्या विधानाने पुन्हा आली.

सुजय विखे यांनी आपल्या जाहीर भाषणात ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, मात्र त्यासाठी त्यांनी नीलेश लंकेंच्या समोर एक अट ठेवली. नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी लंकेंना दिले.

'भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या व्यासपीठावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला.

Nilesh Lanke on Sujay Vikhe:
Madha Lok Sabha Election Result 2024: निंबाळकरांच्या पराभवाचा फटका गोरेंना बसणार? माण-खटावमधील गणिते बदलणार...

"सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढील पाच वर्षांनी त्यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी म्हटलं आहे. पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे म्हणत शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी उद्यापासूनच कामाला लागणार असल्याचे निलेश लंके म्हणाले.

आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांना दिले. "ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने देखील हातात घेतली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झाले असून मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ असे विचारले , असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले," असे ते लंके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com