Mahayuti Government : मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादा अन् शिंदेंसमोर सगळाच प्लॅन सांगून टाकला; 'स्थानिक'ला गडबड होण्याची शक्यता

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रित सामोरे जाणार का? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर विधान केलं.
Mahayuti Government
Mahayuti Government Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीने कसं सामोरे जायचं, यावर भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या उपस्थितीत एका वाक्यात सांगून टाकलं. 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला (Local Body Elections) महायुती एकमताने सामोरे जाईल. परंतु एखाद्या ठिकाणी वेगळे निर्णय घेऊन लढावे लागेल', असे सूचकपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने यांना पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. आदेशाचे आपण स्वागत करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. जामखेडच्या चौंडी येथे भाजप महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे आज बैठक झाली.

या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यावेळी उपस्थित होते.

Mahayuti Government
Deepak Kesarkar : केसरकरांच्या निकटवर्तीयांची 'शक्तिपीठ' मार्गात कोट्यावधींची गुंतवणूक; समर्थनामागची Inside Story ठाकरे गटाने सांगितली!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचे आपण स्वागत करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याचबरोबर निवडणूक आयोगाला देखील विनंती करणार आहोत की, निवडणुकांची तयारी करावी. या निवडणुकांमध्ये भाटिया आयोगाप्रमाणेच ओबीसींचे संपूर्ण आरक्षण लागू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जन्मगावी चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. अशाच पद्धतीने राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठका घेणार आहे का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच नियमित बैठका होतील.

परंतु, अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे पर्व आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण योग साधून त्यांच्या जन्मगावी चौंडी इथं ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तसंच पुढे काही योग आल्यास अशाच बैठका घेण्याचा प्रयास करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com