Deepak Kesarkar : केसरकरांच्या निकटवर्तीयांची 'शक्तिपीठ' मार्गात कोट्यावधींची गुंतवणूक; समर्थनामागची Inside Story ठाकरे गटाने सांगितली!

Konkan Politics Shivsena Vs Shivsena UBT : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ भूमिका घेणं आता एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जड जाण्याची शक्यता आहे.
Shivsena UBT MLA Mahesh Sawant And Deepak Kesarkar
Shivsena UBT MLA Mahesh Sawant And Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on

Shaktipeeth Highway News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध असून दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या आहेत. शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठाला जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी याच मुद्द्यावरून आता जोरदार निशाना साधला आहे. तर केसरकरांच्या ‘शक्तिपीठ’बाबतच्या भूमिकेमुळे सावंतवाडीचे महत्त्व कमी होईल, अशी बोचरी टीका केली आहे.

पूर्वी मुंबई-गोवा महामार्ग हा शहरात जाणार होता. मात्र नंतर याच्या ले आउटमध्ये बदल करण्यात आला. ज्यामुळे तो आता शहराच्या बाहेरून जाणार आहे. यावरूनच ठाकरे गट आता आक्रमक झाला असून थेट केसरकर (Deepak Kesarkar) यांना धारेवर धरले जात आहे. महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने सावंतवाडीचे महत्त्व आणखी कमी होईल, असे ठाकरे शिवसेनेचे (Shivsena UBT) माहीम (मुंबई)चे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला काहीच दिवसांच्यापूर्वी आपला पाठिंबा दिला होता. तो पाठिंबा स्वार्थ ठेवून देण्यात आला. तर आपल्या जवळच्या गुंतवणूकदारांच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळवा यासाठीच हा बदल करण्यात आल्याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. मुंबई-गोवा महामार्ग बाहेरून गेल्याने सावंतवाडी शहराचे महत्त्व कमी होणारच आहे. तर यामुळे पर्यटनावरही परिणाम होणार आहे. पर्यटक आता शहरात येणार नाहीत, तेही महत्त्व कमी होईल, असेही सावंत म्हणाले.

Shivsena UBT MLA Mahesh Sawant And Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : आजारपणातून बाहेर येताच केसरकरांची मोठी घोषणा; शिंदेंचा लाडका 'दीपक' आता राजकारणात दिसणार नाही!

केसरकारांचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन म्हणजे स्वार्थ आहे. त्यांच्या जवळच्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या. एकरी दहा ते बारा हजार रुपये मोजले आणि आता रस्ता झाला तर गुंठ्यांमागे दहा ते वीस लाख रुपये भाव मिळेल. जमिनींना सोन्याचा भाव मिळणार म्हणूनच केसरकर शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत असल्याचा दावा देखील सामंत यांनी यावेळी केला आहे.

तर गुंतवणूकदारांनी चार ते पाच हजार हेक्टर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. आपल्या जवळच्या उद्योजकांच्या जमिनींना चांगला भाव मिळावा म्हणूनच केसरकर शक्तिपीठ मार्गाचे समर्थन करत आहेत. मात्र, त्यामुळे सावंतवाडी शहराचे मोठे नुकसान होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाला तेथील लोकांचा विरोध असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि सरकार दरबारी आवाज उठवू, अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे.

फायद्याच्या प्रभागांसाठी जातनिहाय सर्वेक्षण

तसेच प्रत्येक पक्षात जातनिहाय डाटा असतो. सरकारचा काय हेतू आहे, ते माहीत नाही. मताधिक्य पाहून प्रभाग फोडायचे असतील. फायद्याचे प्रभाग बनवायचे असतील. मताधिक्याच्या आघाडीवर ते प्रभाग बनवणार असतील. भाजपची सत्ता आल्यानंतर जातपात उफाळून आला आहे. जात-पात आणि हिंदू-मुस्लिम हे भाजपच उरकून काढत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने कधीही जात-पात पाहिली नाही.

प्रस्तावित मायनिंग प्रकल्पासाठीच पाठिंबा?

दरम्यान याआधीही जिल्हाध्यक्ष मायकल डिसोजा केसरकरांच्या भूमिका जाहीर टीका केली होती. त्यांनी, प्रस्तावित मायनिंग प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच केसरकर शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा देत असल्याचा दावा केला होता. त्यांचे सरकार आहे म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. तर आपला स्वार्थ यात दडल्याने तो दिला. याच्याआधी येथून गेलेल्या झाराप-पत्रादेवी महामार्गाला त्यांनी विरोध केला नाही. साधा ‘ब्र’ शब्द सुद्धा काढला नाही. सावंतवाडी शहरातून जाणार महामार्ग त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बाहेरून नेला.

Shivsena UBT MLA Mahesh Sawant And Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे सिंधुदुर्गला आले; पण स्टेजवर लाडका 'दीपक' दिसलाच नाही...

तसेच आताही शेती आणि बागायतींचे मोठे नुकसान होऊन जैवविविधता नष्ट करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला ते समर्थन देत आहेत. ते फक्त आपली मालमत्ता वाचावी, त्यांचा प्रस्तावित मायनिंग प्रकल्प मार्गी लागावा आणि उद्योगपतींनी विकत घेतलेल्या जमिनींना कोट्यवधीचा भाव मिळावा म्हणून, असाही आरोप मायकल डिसोजा यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com