Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याचे बोधचिन्ह ठरले; त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगाला स्थान! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Official Logo of Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
Chief Minister Devendra Fadnavis unveiling the official emblem of the upcoming Kumbh Mela at a ceremonial event.
Chief Minister Devendra Fadnavis unveiling the official emblem of the upcoming Kumbh Mela at a ceremonial event.sarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचं विविध वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. यंदा कुंभमेळ्यासाठी नवे बोधचिन्ह निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह आहे.

आगामी 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ रामकुंड येथे होणाऱ्या ध्वजारोहणाने होणार आहे. येत्या 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होईल. नाशिकच्या पुरोहित संघाने त्याचे आयोजन केले आहे. यावेळी सर्व आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित असतील.

आगामी कुंभमेळ्यात पाच शाही स्नान होणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन ऑगस्ट २०२७ रोजी पहिले, 31 ऑगस्टला दुसरे स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होईल. 11 सप्टेंबर रोजी नाशिक येथे तिसरे आणि बारा सप्टेंबरला त्र्यंबकेश्वर येथे तिसरे शाही स्नान होईल. याशिवाय नाशिक येथे 24 जुलै २०२८ रोजी नाशिकला रामकुंडावर चौथे शाही स्नान होणार आहे.

Chief Minister Devendra Fadnavis unveiling the official emblem of the upcoming Kumbh Mela at a ceremonial event.
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांवरून वाद पेटला ; नगरसेविकांच्या पतींना पोलिसांनी तंबी दिल्याने महासभेत संतापाचा स्फोट

शैव परंपरेतील नऊ आखाडे त्र्यंबकेश्वर येथे तर वैष्णव परंपरेतील दिगंबर, निर्वाणी आणि निरमोही हे तीन आखाडे नाशिकला कुंभमेळ्यात सहभागी होती. त्यासाठी नाशिक शहरात तपोवन येथे साधूग्राम उभारण्यात येईल. यंदा देशभरातून कोट्यावधी भाविक कुंभमेळ्यात सहभागी होती असा सरकारचा दावा आहे.

राज्य शासनाने यंदा कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त केले आहे. शासनाने 35000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्धार केला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि विविध विकास कामे करण्यात येतील.

Chief Minister Devendra Fadnavis unveiling the official emblem of the upcoming Kumbh Mela at a ceremonial event.
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात 12 कोटी भाविकांच्या मदतीसाठी ‘कुंभदूत’ची एंट्री.. CM फडणवीसांचा दृष्टिकोन काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com