Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांवरून वाद पेटला ; नगरसेविकांच्या पतींना पोलिसांनी तंबी दिल्याने महासभेत संतापाचा स्फोट

Nashik municipal controversy : कुंभमेळ्यानिमित्ताने सुरु असलेल्या कामांत काही नगसेवकांनी हस्तक्षेप करत धमकी दिल्याचा आरोप ठेकेदाराने केला होता. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवकांची चौकशी केली होती.
Devendra Fadnavis Nashik Kumbh Mela
Kumbh Mela NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्ताने कुंभमेळा प्राधिकरणाकडून सुरु असलेल्या कामांमध्ये कुणी मुद्दाम अडथळा आणला तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेत एका ठेकेदाराने थेट नगरसेवकांविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. नगसेवकांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावरुन पोलिसांनीही संबधित पाच नगरसेवकांना चौकशीसाठी ताब्यात घेत तंबी दिली होती. यात काही महिला नगरसेकांच्या पतींचाही समावेश होता. त्याचेच पडसाद महासभेत उमटले.

सिंहस्थ कामांमध्ये हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरुन पाच नगरसेवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यामागे षडयंत्र असून लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या ठेकेदारावच कारवाई केली जावी अशी मागणी महासभेत नगरसेवकांनी केली. महासभेत नगरसेवकांच्या नाराजीचा मोठा भडका उडाल्याचे पहायला मिळाले.

नगरसेवकांनी हा आपला अपमान असल्याची भावना व्यक्त केली. संविधानानुसार नगरसेवकांना कामांची चौकशी करण्याचा व जाब विचारण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थिती करण्यात आला. महापालिकेत प्रथमच पोलिस आल्याचा मुद्दा अधोरेखित करताना परवानगीशिवाय पोलिस घुसलेच कसे असा प्रश्नही विचारण्यात आला. नागरिकांचे प्रश्न सोडविता येत नसेल तर नगरसेवक होण्याचा उपयोग तरी काय अशी खंत नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली.

Devendra Fadnavis Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? कुणाला पडला प्रश्न? गिरीश महाजनांना कुणी काढले चिमटे?

दरम्यान यावर महापौर हिमगौरी आडके यांनी याप्रकरणाचा निषेध व्यक्त करताना प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामे करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. असा प्रकार पुन्हा घडायला नको हे सांगताना नगरसेवकांना मानसन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकप्रतिनीधींची बदनामी करणाऱ्या ठेकेदारासह प्रशासनाला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

Devendra Fadnavis Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांमध्ये भ्रष्टाचार कराल तर तुरुंगात खडी फोडायला जाल, आयुक्त गेडामांचा ठेकेदारांना इशारा

'कुंभमेळा प्राधिकरण समन्वय समिती'

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात होणारी विकासकामे महापालिकेमार्फत न करता शासनाने गठीत केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणामार्फत राबवली जात आहेत. त्यावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत मग महापालिकेची नेमकी भूमिका काय? असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत उपस्थितीत केला. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि प्राधिकरण यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी 'कुंभमेळा प्राधिकरण समन्वय समिती' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत कुंभमेळ्याचा अनुभव असलेला नगरसेवकांचा समावेश करण्यात येणार असून प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या कामांची नियमित माहिती सभागृहाला देण्याचे ठरवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com