Sanjay Sawant slams Gulabrao Patil : गुलाबरावांनी मंत्रीपदासाठी किती वेळा राऊतांच दार ठोठावलं, हे सांगावं..

Sanjay Sawant : राऊतांनी देवीवर हात ठेवून सांगावं कि मी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही..
 Gulabrao Patil, Sanjay Sawant
Gulabrao Patil, Sanjay Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : शिवसेना (शिंदे गट) नेते, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊतांवरील गुलाबरावांच्या टीकेला ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

 Gulabrao Patil, Sanjay Sawant
Udayanraje Vs Shivendraraje : दोन राजांच्या वादात आता राऊतांची एन्ट्री ; म्हणाले, "हा तर छत्रपतींच्या .."

रविवारी शिरसोली येथे जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांविषयीची मोठा गौप्यस्फोट केला. "मंत्रीपद मिळवण्यासाठी किती वेळा गुलाबरावांनी राऊतांच दार ठोठावलं आहे, हे गुलाबराव पाटील विसरले आहेत," असे सावंत म्हणाले.

 Gulabrao Patil, Sanjay Sawant
Imtiyaz Jaleel on Navneet Rana : इम्तियाज जलीलांचे नवनीत राणानं खुलं आव्हान ; ओवेसींनी परवानगी दिली तर..

"गुलाबराव पाटील हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपासक आहेत. दर वाढदिवसाला ते नेहमीच त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात त्यांनी देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं कि मी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही," असे आव्हान संजय सावंतांनी गुलाबराव पाटील यांना केले आहे.

 Gulabrao Patil, Sanjay Sawant
Sanjay Raut slams Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंच्या नातवानं शेण खाल्लं ; राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं..

"आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत, त्यांच्यावर आपण आरोप करू शकतो काय,हे गुलाबराव पाटील यांनी तपासावे. आणि मग निष्ठेच्या गोष्टी कराव्यात. गुलाबराव पाटलांनी आपली पात्रता तपासावी आणि मग संजय राऊत यांच्यावर आरोप करावे," असेही सावंत म्हणाले

"गुलाबराव पाटील यांच्यासोबत संपर्कप्रमुख म्हणून मी काम केलं आहे. त्यामुळे त्यांचे अनेक किस्से, अनेक गोष्टी मला माहित आहेत. जर गुलाबराव शांत झाले नाहीत तर असे गौप्यस्फोट मी करतच राहील," अस इशारा संजय सावंत यांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com