Eknath Shinde; लवटे, बोरस्तेंना एकनाथ शिंदे यांनी दिले न्यू इयर गिफ्ट!

राजू लवटे सहसंपर्क तर आणि अजय बोरस्ते जिल्हाप्रमुख झाले.
Raju lavte & Ajay Boraste With CM Eknath Shinde
Raju lavte & Ajay Boraste With CM Eknath ShindeSarkarnama

नाशिक : (Nashik) बाळासाहेबांची शिवसेनेचे (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या सहसंपर्कप्रमुखपदी माजी नगरसेवक राजू आण्णा लवटे (Raju lavte) तसेच अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या दोन्ही माजी नगरसेवकांनी नुकतेच उद्धव ठाकरे गटाचा (Uddhav Thackrey) राजीनामा देत प्रवेश केल्याने त्यांना नवीन वर्षात या प्रवेशाचे गिफ्ट मिळाले आहे. (Eknath Shinde appoints Lavte & Borste for Nashik Chief)

Raju lavte & Ajay Boraste With CM Eknath Shinde
Congress; ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

आज सकाळी मुंबईत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Raju lavte & Ajay Boraste With CM Eknath Shinde
Nashik; भाजपमध्ये मोठा गोंधळ, पदवीधरचा उमेदवारच ठरेना!

मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी माजी नगरसेवक राजू अण्णा लवटे, नाशिक जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेचे माजी नगरसेवक बोरस्ते शिवसेनेचे तीन वेळा नगरसेवक होते. त्यांनी महानगरप्रमुखपद भुषविले होते. श्री. लवटे माजी नगरसेवक असुन ते देखील दोन वेळा नगरसेवक होते. त्यांनी उद्धव ठाकरे गटातर्फे 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोन्ही नेत्यांची पदावर नियुक्ती होणार याची चर्चा होती.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले. लवकरच पक्षाच्या विस्तारासाठी जिल्ह्यात दौरा करणार असल्याचे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी यावेळी जाहीर केले. शविसेना व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com