Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

मुक्ताईनगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : आमच्यावर टीका होत आहे. (Criticisms on Us) मात्र आपण त्याचा विचार करीत नाही. (We Do not care obout that) आपल्याला जनतेचे भले करून दाखवायचे आहे, ते आपण करणार आहोत. आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री (MC on Contract) म्हटले जाते, होय आम्ही कंत्राट घेतले आहे, विकासचे आणि जनतेला न्याय देण्याचे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (CM Eknath Shinde said we will work more in less time)

Eknath Shinde
Foxcon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी!

मुक्ताईनगर येथे मंगळवारी जाहीर सभा झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आम्हाला २०-२० खेळायची आहे. कमी वेळेत जास्त धावा काढायच्या आहेत. मी आणि फडणवीस आम्ही आव्हान स्वीकारले आहे. ते आम्ही करून दाखविणार आहोत.

Eknath Shinde
NCP News: नरहरी झिरवळांनी दिंडोरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. ते म्हणाले, ‘वेदांता फॉक्सकॉन’ला महाविकास आघाडी सरकारने कोणतेही सहकार्य केले नाही, त्यामुळेच ती कंपनी बाहेर गेली आणि ते आमच्यावर खापर फोडत आहेत. परंतु याची चौकशी करून ‘दूध का दूध पानी का पानी करू.

‘दाऊद’पेक्षा मोदीचा हस्तक योग्य

नवाब मलिक यांचे नाव न घेता ते म्हणाले, की आघाडी सरकारमध्ये मुंबई बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दाऊदचा हस्तक एक मंत्री असल्याचे दिसून आले. त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि आम्हाला मोदींचा हस्तक म्हणतात, दाऊदपेक्षा मोदींचा हस्तक झालेले चांगले

सत्तेसाठी तडजोड नाही

आपण सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली नाही, असे सांगून ते म्हणाले, ज्यांनी २५ वर्षे युती टिकवली, त्यांच्याशी युती करायची नाही तर कुणाशी करायची, त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत.

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com