Shivsena Politics; भास्कर बनकर देणार शिवसेनेला दुसरा हादरा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे केले नवनिर्वाचीत सरपंच बनकर यांचे अभिनंदन.
Anil Kadam, Bhaskar Bankar & Dilip Bankar
Anil Kadam, Bhaskar Bankar & Dilip BankarSarkarnama
Published on
Updated on

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव ग्रामपंचायत (Nashik) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांच्या पॅनेलचा पराभव करीत (Shivsena) भास्करराव बनकर (Bhaskarrao Bankar) सरपंच झाले. या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी भास्करराव यांना फोन करून अभिनंदन केले. त्यामुळे निफाडच्या राजकारणात तिसरी शक्ती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. (Bhaskarrao Bankar may join Eknath Shinde group to face local politics)

Anil Kadam, Bhaskar Bankar & Dilip Bankar
Shocking News; संपर्कप्रमुखांनीच फोडले शिवसेनेचे 13 नगरसेवक?

या फोनमुळे शिवसेनेत माजी आमदार अनिल कदम यांच्याशी दुरावा वाढल्याने बनकर एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून निफाड तालुक्यातील दिलीप बनकर आणि अनिल कदम अशा दुहेरी राजकारणात ठाकरे गटाला हादरा देत प्रदिर्घ काळानंतर तिसरा अँगल निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Anil Kadam, Bhaskar Bankar & Dilip Bankar
Rural Politics; चांदोरीत नवनिर्वाचीत सरपंचाने केला पराभूताचा घरी जाऊन सत्कार

निवडणुकीचा निकाल फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्हासाठी चर्चेचा विषय बनला होता. यात माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या पॅनलले सत्ताधारी पॅनलचा पराभव केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नवनिर्वाचीत सरपंच बनकर यांना फोन करून शुभेच्छा देत तब्येतीची विचारपूस केली. या चर्चेत गावच्या विकासाच्या मुद्यावर सर्व नवनिर्वाचीत सदस्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांनी निमंत्रण दिले.

सरपंचपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भास्करराव बनकर हे ठाकरे की शिंदे गटाचे यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र बनकर यांच्याकडून कोणताही खुलासा झालेला नव्हता. बुधवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे व सरपंच बनकर यांच्यात भ्रमणध्वनीवरून झालेल्या संवादाने त्यातील ट्विस्ट अधिक वाढला आहे. शिंदे-बनकर यांच्यातील संवादाने शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

प्रचारातील दगदगीने प्रकृती अस्वस्थामुळे बनकर हे सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला त्यांना दिला. थेट सरपंचपदी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करताना बरे वाटल्यावर सर्व सदस्यांना घेऊन भेटीला या असे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माझ्या स्वागतासाठी रात्री उशीरापर्यत थांबल्याची आठवण बनकर यांना करून दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधत तब्येतीची विचारपूस केली. लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा व्यक्त करताना सरपंचपदी विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. सदस्यासह मला भेटीला येण्याचे आमंत्रण ही दिले आहे. गटाच्या नेत्यांशी चर्चा करून लवकरच त्याबाबत निर्णय घेणार आहे.

-भास्करराव बनकर, नवनिर्वाचीत सरपंच, पिंपळगाव बसवंत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com