Eknath Shinde News: डबल इंजिन सरकार सर्वांचा विकास करील!

Water Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनमाड शहराच्या करंजवण - मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन झाले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Manmad News: (Nandgaon) या शहरासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. शहरावरील पाणीटंचाईचा (Water) कलंक पुसला जाणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) करंजवण - मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन झाले असून कामही युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. योजना पूर्ण होईपर्यंत या कामाला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. (Manmad city people will get water everyday after new water scheme)

मनमाड शहर पाणी पुरवठा योजना, नांदगाव येथील शिवसृष्टीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कामाला सर्व मदत करण्याचा शब्द देतो असे सांगत मनमाड शहराला आता पाण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार नसून दररोज पाणी मिळणार असे ते म्हणाले.

CM Eknath Shinde
Nashik News : भाजपचं ठरलं ; लोकसभा निवडणुकीत मताधिक्यांसाठी अशी असेल रणनीती

श्री. शिंदे म्हणाले, की पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मनमाडकर एवढे दिवस का थांबले? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्यावर अनेक आरोप होतात, मात्र त्या आरोपाचे उत्तर आम्ही कामाच्या माध्यमातून देत आहोत. डबल इंजिन असलेले आमचे राज्यातील व केंद्रातील सरकार हे सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करत आहे. करंजवन योजनेसाठी पालिकेला द्यावा लागणारा १५ टक्के स्वनिधी सरकार भरणार असल्याचे सांगत, ट्रामा केअर सेंटर, मनमाड नगरपरिषद कार्यालयासाठी १० कोटी रुपये व एमआयडीसीसाठी येत्या महिनाभरात भूसंपादनाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी देत बंद पडलेल्या सर्व योजना आम्ही मार्गी लावल्याचे सांगितले.

CM Eknath Shinde
Old Pension News; भाजप अडचणीत...17 लाख कर्मचारी जाणार संपावर

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या ५० टक्के समस्या कमी होणार आहे. या योजनेसोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील ५०० पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे मनमाडच्या विकासात भर पडणार आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, अंजूम कांदे,बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, राजेंद्र भाबड, सुनील हंडगे, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, संतोष आहिरे, डॉ. संजय सांगळे, बब्बीकाका कवडे, राजेंद्र आहिरे, राजेंद्र पगारे, गंगादादा त्रिभुवन, दिनकर धिवर, कैलास आहिरे, पंकज खताळ आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com