Maratha Vs OBC : मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणावरुन न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, ते घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या देहबोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी असल्याचे दिसत नाही. त्यांनी न्यायालय तसेच प्रशासनाची दिशाभूल केली आहे.
अशी खोटी कारणे देणे म्हणजे एक प्रकारे फसवणूक आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत वैद्यकीय तपासणी करावी आणि त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. याबाबतचे निवेदन धुळे (Dhule) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना घेरण्यासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध ठिकाणी सभा आंदोलने, मोर्चा सुरु आहेत. प्रत्येक जिल्हा व ग्रामीण स्तरावर शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या प्रयत्नात आहे, त्यात अडथळा आणण्याचे काम भुजबळ मंत्रीमंडळात राहून करीत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात जामीनावर असलेले मंत्री भुजबळ हे ओबीसी समाजाची दिशाभूल करून मराठा व ओबीसी समाज यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत.
त्यासाठी ते विविध ठिकाणी ओबीसी (OBC) समाजाच्या सभा घेत आहेत. त्या सभांमध्ये ते तरुणाला लाजवेल याप्रमाणे जोरजोरात सलग एक ते दोन तास भाषण देताना दिसत आहेत. त्यांच्या सभांमध्ये ते मराठा समाजाला टार्गेट करताना दिसतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी मंत्री भुजबळ यांची भूमिका आहे. त्यांच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते व शांततेला गालबोट लागू शकते.
त्यामुळे त्यांचा जामीन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भानुदास बगदे, मनोज ढवळे ,राजेंद्र काळे, भय्या शिंदे, राजेंद्र मराठे , संतोष लकडे, विनोद जगताप, निंबा मराठे, अभिनव पाटील, सुधाकर बेंद्रे, सुरेश पवार, दीपक रौंदळ, बाजीराव खैरनार आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.