Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Reservation: जरांगे-पाटलांनी पुन्हा डोळे वटारले; म्हणाले, जर दोन दिवसांत...

Manoj Jarange Patil: ''सरकार नोटिसा देऊन आमचं आंदोलन दडपू शकत नाही...'
Published on

Parbhani News: 'एका शब्दावर एक-एक तास चर्चा झाली. तुमच्याच शब्दावर तुम्ही अजून टाइम बाऊंड दिला नाही. सरकार नोटिसा देऊन आमचं आंदोलन दडपू शकत नाही. 24 डिसेंबरचा शब्द त्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावे. दोन दिवसांत आरक्षणाचं काही झालं नाही, तर आमची पुढची दिशा ठरणार', असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. 'मराठे आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालं', असे जरांगे-पाटील यांनी परभणीच्या सेलूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा दिलेला अल्टिमेटम आता दोन दिवसांत संपत आहे. त्यावर सरकारने जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील राज्यभर दौरे करत ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आज शुक्रवारी ते परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Baramati News: सुप्रिया सुळेंना घेरण्यासाठी भाजपचं ओबीसी कार्ड; पडळकरांवर मोठी जबाबदारी

जरांगे-पाटील म्हणाले, 'सरकारने दिलेल्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करत आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. तसेच आईच्या मुलाला तिचं आरक्षण नाही हे किती विचित्र आहे. आई आणि मुलाच्या रक्ताच्या नात्याहून मोठं कोणतं नातं आहे?' असा सवाल करत 'आई ओबीसी असेल तर मुलाला देखील ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे', अशी मागणी त्यांनी केली.

"तुम्ही 144 कलम का लागू का केलं ? सरकारने नोटीसा का दिल्या ? सरकारने आता नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये, अन्यथा यापेक्षा दुप्पट लोक आंदोलनात सहभागी होतील. सरकार चालवणारे आणि कायदे करणारे तुम्हीच आहात. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर ठाम राहावं. तसेच त्यांनी दिलेल्या एका-एका शब्दावर एक-एक तास चर्चा झालेली आहे, असे सांगत जरांगे-पाटलांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्नांवर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

Manoj Jarange Patil
Sanjay Raut News: भाजपनं देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला; राऊत कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com