नाशिक : राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, एकमेकांवर टीका-टिप्पणी हे चित्र राज्यात नेहमी पाहायला मिळते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये नियमती खटके उडताना दिसतात. शिवसेनेचा किल्ला जोरदार पणे लढवत आपल्या शाब्दीक बाणांनी भाजपला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नियमीत घायाळ करत असतात. मात्र, राजकारणापलिकडे जात वेगवेगल्या पक्षातील लोक आपलै व्यक्तिगत संबंध जोपासतानाही दिसून दिसतात. ही एक वेगळी राजकीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे. संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आरोप, कधी वैयक्तिक टीका होत असते. मात्र, आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्याचे दिसून आले. राऊतांनी फडणवीसांच्या हातात हात देत अन् विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे प्रवीण दरेकर यांच्या पाठीवर थाप देत चांगलाच हास्यकळलोळ रंगला. निमित्त होते भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाहाचे.
भाजपच्या प्रदेश प्रतोद व आमदार देवयानी व प्रा. सुहास फरांदे यांची कन्या सायली व सांगली महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका भारती दिगडे व हेमंत दिगडे यांचा मुलगा स्वप्निल यांचा विवाह त्र्यंबकरोडवरील एका रिसॉर्ट मध्ये थाटामाटात शनिवारी (ता. २०) पार पडला. विवाह सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यात देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, संजय राऊत, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, डॉ. भारती पवार, चंद्रकांत पाटील, माजी मत्री जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, श्रीकांत भारतीय, केशव पाध्ये, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार ॲड. राहुल ढिकले, सिमा हिरे, भाजपच्या चित्रा वाघ, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे आदी उपस्थित होते.
या आधी छगन भुजबळ आणि संजज राऊतांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती. संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात नांदगावमध्ये असताना छगन भुजबळ यांना अंगावर घेण्याची भाषा केली होती. भुजबळांनीही राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर मात्र, आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील हे एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत तर मधे भुजबळ बसले होते. या वेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.