Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

यापूर्वी आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत जाण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शविला होता.
Sharad Pawar-Nana Patole-Prakash Ambedkar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Nana Patole-Prakash Ambedkar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) शिवसेनेबरोबर (Shivsena) आघाडी (Alliance) करण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अखेर तयारी दर्शवली आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत जाण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शविला होता. मात्र, आता ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास तयार आहेत. (Prakash Ambedkar ready to Alliance with Shiv Sena along to Congress-NCP)

यासंदर्भात अमरावतीमध्ये बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेला वाटतंय की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो महाविकास आघाडीतील पक्षांचा विषय आहे. आम्ही शिवसेनेला म्हटलं आहे की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, आम्ही त्यांचंही स्वागत करू. राष्ट्रवादीला त्यांनी आणलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा याबाबतचा निर्णय होईल. त्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल.

Sharad Pawar-Nana Patole-Prakash Ambedkar-Uddhav Thackeray
Moreshwar Temurde : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे झोपेतच हृदयविकाराने निधन

दरम्यान, शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले यांनी भाजपसोबत राहण्यास पसंत दिली. त्याची त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळून बक्षीसीही मिळाली. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेला राजकीय मित्रांची सध्या गरज आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सध्या मित्रांची चाचपणी सुरू केली आहे.

Sharad Pawar-Nana Patole-Prakash Ambedkar-Uddhav Thackeray
Maharashtra Politics : कोकणात विजय मिळविणारे राजन साळवी आणि शिलेदारांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

दरम्यान, शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले यांनी भाजपसोबत राहण्यास पसंत दिली. त्याची त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळून बक्षीसीही मिळाली. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेला राजकीय मित्रांची सध्या गरज आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सध्या मित्रांची चाचपणी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com