नाशिक : समर्पित आयोगामार्फत ओबीसींचा (OBC) इम्पेरिकल डेटा सदोष पद्धतीने होत असून चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) येथे आज तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. याच पध्दतीने डेटाचे काम सुरु राहिल्यास ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण धोक्यात येईल असा इशारा देण्यात आला. (OBC Emperical data collection should be in scintific way)
नाशिक येथे अखिल भारतीय समता परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यात परि,देचे उपाध्यक्ष दिलीप खरै, बाळासाहेब कर्डक, नाना महाले, अंबादास खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॅा. योगेश गोसावी आदी सहभागी झाले. (Nashik Latest Marathi News)
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी गठित केलेल्या बाठिया आयोगाने न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदारी जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. परंतु, आयोग माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे.
ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील याचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. याकरिता समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे. तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
येवला येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन शेलार, माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सचिन कळमकर, दीपक लोणारी, भूषण लाघवे, अजीज शेख, बबनराव शिंदे, सचिन सोनवणे, डॉ. प्रदीप बुळे, भगवान ठोंबरे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विकी बिवाल आदी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.