Teachers constituency 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-आमदार किशोर दराडेंकडून आचारसंहिता धाब्यावर?

CM Eknath Shinde MLA Kishore Darade : मतदारसंघातील स्पर्धक उमेदवार आणि काही संघटनांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
CM Eknath Shinde MLA Kishore Darade
CM Eknath Shinde MLA Kishore Daradesarkarnama

Kishor Darade News: विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या काळात आमदार किशोर दराडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यामुळे आमदार दराडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मतदारसंघातील स्पर्धक उमेदवार आणि काही संघटनांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आमदार दराडे यांना निवडणूक सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली. त्यात त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा दावा केला आहे.

आमदार किशोर दराडे गेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्याने विजयी झाले होते. गेली सहा वर्ष ते ठाकरे गटाशी संलग्न असल्याचे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी त्यांची जवळीक होती. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे दराडे यांनी यातून राजकीय डावपेच लढवीत मुख्यमंत्री शिंदे यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच बैठक घेऊन शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा वाद सोडविण्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता ही बैठक वादात सापडली आहे.

आमदार किशोर दराडे आज (शुक्रवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा दावा आहे.

CM Eknath Shinde MLA Kishore Darade
Konkan Graduate Election : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार, भाजपला पुन्हा 'बिनशर्त' पाठिंबा?

मुंबईत 3 जूनला याबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीमुळे आमदार किशोर दराडे यांच्याकडून आदर्श आचारसंहिता नियमावलीचा भंग झालेला आहे. त्यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याने त्याचा निवडणूक व मतदारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एस आर देशमुख यांनी केली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com