Konkan Graduate Election : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार, भाजपला पुन्हा 'बिनशर्त' पाठिंबा?

Abhijit Panse Vs Niranjan Davkhare : मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यासमोरील अडचणी वाढली होत्या.
niranjan davkhare | raj thackeray | abhijit panse
niranjan davkhare | raj thackeray | abhijit panseSarkaranama

Mumbai News, 7 June : लोकसभेची रणधुमाळी आटोपताच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीसाठी 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या मनसेसह महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

कोकण पदवधीर मतदारसंघातून (Konkan Graduate Election) विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याविरोधात मनसेनं दिग्दर्शक अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर केली होती.

त्यामुळे मनसे विरुद्ध भाजप, अशी ही लढाई होणार होती. पण, यात एक ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेनं माघार घेतली आहे. यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी निवडणूक येथे रंगणार आहे.

याबाबत मनसेचे नेते, नितीन सरदेसाई म्हणाले, "कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

पण, अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन राज ठाकरेंनी अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील."

niranjan davkhare | raj thackeray | abhijit panse
RSS & Devendra Fadnavis : लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची 'आरएसएस'च्या नेत्यांशी 'गुफ्तगु'

"निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला आहे. अभिजीत पानसे हे निवडणूक लढणार नाहीत. निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील. यानिर्णयावरती शिक्कामोर्तब झाला आहे.

बिनशर्त पाठिंब्याबाबत राज ठाकरे स्वत: बोलतील. पण, अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र, आमचा स्वतंत्र पक्ष आहे," असं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कोकण पदवीधरमधून काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस अर्थात निरंजन डावखरे विरुद्ध रमेश कीर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com