Ajit Pawar News : अर्थ खाते अजित पवारांकडे? 'या' पत्राची होतेय जोरदार चर्चा

Devendra Fadnavis News : उद्योग, उर्जा, कामगार विभागाचे परिपत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Ncp News : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमून एक परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. या पत्रकावर उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सुधीर मुनगंटीवार (वने), उदय सामंत (उद्योग) आणि अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे दिलेली आहेत. मात्र, (वित्त) खात्यावर कोणत्याही मंत्र्यांचे नाव नसल्याने हे खाते अजित पवार गटाकडे जाणार, असल्याचे सांगितले जात आहे. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्योग, उर्जा, कामगार विभागाचे परिपत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. या परिपत्रकात फडणवीस यांच्या नावापुढे (उर्जा) खाते असे लिहिले आहे. तर त्याच्याखाली (वित्त) खात्यापुढे कोणत्याही मंत्र्याचे नाव लिहिलेले नाही. त्यामुळे अर्थ खाते हे अजित पवार गटाकडे जाणार असे बोलेल जात आहे.

Ajit Pawar News
Dilip Walse Patil on Sharad Pawar : शरद पवार आपले नेते ; चुकीचे काही बोलू नका : बंडानंतर वळसे पाटील प्रथमच बोलले

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमली. या उपसमितीत शिंदे सरकारच्या ५ मंत्र्यांची नावे देण्यात आली आहेत. या उपसमितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. सध्या अर्थ खाते हे फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, वित्त मंत्री या म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. फडणवीस यांच्या नावासमोर अर्जा मंत्री असा उल्लेख आहे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शरथ घेतल्यानंतर शिंदे गटात नाराजी आहे, अशी चर्चा रंगली आहे. तसेच अजित पवार यांना अर्थ मंत्री पद देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले होते. यामुळे आघाडी सरकार कोसळे. यानंतर शिंदे यांनी व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यामध्ये आम्हाला निधी मिळत नव्हता असा आरोप त्यांनी केला होता.

Ajit Pawar News
Chagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केलं; भूजबळांचा गौप्यस्फोट

मात्र, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-सरकारला पाठिंबा दिला. यामुळे पुन्हा आता अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे गेले तर आपली अडचण होईल, अशी भिती शिंदे गटातील आमदारांना आहे. राज्य सरकारकडून काढलेल्या परिपत्रकारवर अर्थ खात्यासमोर कोणत्याही मंत्र्याचे नाव नाही, याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com