नवीन चेहऱ्यांना संधी देत काँग्रेसने फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग!

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीवर नाशिकच्या विजय राऊत, अनिल कोठुळेंची निवड
Anil Kothule & Vijay Raut
Anil Kothule & Vijay RautSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (ओबीसी विभाग) प्रदेश उपाध्यक्षपदी विजय राऊत (Vijay Raut), तर सरचिटणीसपदी अनिल कोठुळे (Anil Kothule) यांची निवड झाली. याशिवाय शहर ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गौरव वाघ व प्रदेश संघटक सचिवपदी चारुशीला काळे या नवीन चेहऱ्यांना संधी देत आगामी निवडणुकांचे रणशिंगही फुंकले आहे.

Anil Kothule & Vijay Raut
हाय व्होल्टेज ड्रामा; माजी आमदार म्हणतात, `ये मालेगाव है, लोकशाही चलेगी, नोकरशाही नही`

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी महाराष्ट्र दौरा करत ओबीसी विभागाच्या जिल्हावार बैठका घेऊन अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडे पाठविला होता. राष्ट्रीय अध्यक्ष व छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांच्या आदेशान्वये नवीन कार्यकारिणीस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. देशांत ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यामुळे ओबीसी विभागाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

Anil Kothule & Vijay Raut
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त ओबीसी घटकांना संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे त्यामुळे कार्यकारिणी करताना सर्व समाज घटकांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस ताकदीने लढणार असल्यामुळे ज्येष्ठ आणि तरुणांना देखील संधी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून उपाध्यक्ष म्हणून माळी समाजातील कार्यकर्ते व शहर काँग्रेस ज्येष्ठ उपाध्यक्ष विजय राऊत, तसेच वीर शैव लिंगायत शिवा संघटनेचे अध्यक्ष अनिल कोठुळे, संघटक सचिव पदी चारुशीला काळे तर सचिव म्हणून अतिक मोईनुद्दीन अत्तार यांना प्रदेश कार्यकारिणी मध्ये स्थान देऊन पक्षाच्या बळकटीसाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडीचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, गटनेते शाहू खैरे, सरचिटणीस हेमलता पाटील यांनी स्वागत केले आहे.

यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमात महिला काँग्रेस अध्यक्षा वत्सला खैरे, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, राजेंद्र बागूल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनीफ बशीर, सुरेश मारू, उद्धव पवार, विजय पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील आव्हाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव तांबे, उत्तमराव बडदे, प्रभाकर पाटील, नंदकुमार येवलेकर, मयूर मोटकरी, महेश गायकवाड, अण्णा विधाते आदींनी त्यांचे स्वागत केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com