हाय व्होल्टेज ड्रामा; माजी आमदार म्हणतात, `ये मालेगाव है, लोकशाही चलेगी, नोकरशाही नही`

संजय गांधी निराधार अनुदानावरून माजी आमदार - तहसीलदारांमध्ये खडाजंगी झाली.
Ex MLA Asif Shaikh & Tahsildar Chandrajeet Rajput.
Ex MLA Asif Shaikh & Tahsildar Chandrajeet Rajput.Sarkarnama

मालेगाव : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात सोमवारी चांगलेच रणकंदन झाले. माजी आमदार आसीफ शेख (Ex MLA Asif Shaikh) व तहसीलदार चंद्रजीत राजपूत (Tahsildar Chandrajeet Rajput) यांच्यातील चर्चेला अचानक वेगळे वळण मिळाले. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ये मालेगाव है, लोकशाही चलेगी, नोकरशाही नही, चार दिन में काम नही हुआ तो देखता, असा दम देवून शेख निघून गेले.

Ex MLA Asif Shaikh & Tahsildar Chandrajeet Rajput.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

शहरासह तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या विविध योजनांच्या लाभार्थींची अनुदान हयात दाखल्यांअभावी प्रलंबित आहेत. निराधारांचे अनुदान त्वरीत द्यावे, या मागणीसाठी माजी आमदार आसिफ शेख व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत लाक्षणिक आंदोलन केले.

Ex MLA Asif Shaikh & Tahsildar Chandrajeet Rajput.
भुजबळ-कांदे वादाला वेगळे वळण; निकाळजे म्हणतो, आमदार सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल करा!

अनुदान रखडल्याने व हयात दाखल्यांअभावी निराधारांची दिवाळी अंधारात, वीस हजार लाभार्थी वंचित हे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध केले होते. शहर व तालुक्यातील तब्बल १९ हजार ९४२ लाभार्थी हयातीच्या दाखल्यांअभावी अनुदानापासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार लाभार्थींचे अनुदान वितरीत करावे, अन्यथा ८ नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन श्री. शेख यांनी दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. चर्चेत हयातीच्या दाखल्याशिवाय अनुदान नाही. शासन आदेशानुसार याबाबत काम सुरु आहे.

हयातीचे दाखल जमा होताच अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात येईल, असे श्री. राजपूत सांगत असतानाच काही कार्यकर्ते संतप्त झाले. चर्चेतच वादाची ठिणगी पडली. संतप्त झालेल्या श्री. शेख यांनी तहसीलदार श्री. राजपूत यांची कानउघाडणी करत दम भरला. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी श्री. राजपूत यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. तासाभरानंतरच वाद क्षमला. चार दिवसात प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडू. तहसील कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणू, असा इशारा श्री. शेख यांनी दिला. आंदोलनात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शकील जानी बेग यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

...

हयातीचे दाखले जमा करावेत असे शासन आदेश आहेत. त्यानुसार कामकाज सुरु आहे. लाभार्थींनी हयातीचे दाखले त्वरीत जमा करावे, असे आवाहन यापूर्वीही केले होते. पुन्हा करतो. माजी आमदारांचा काही तरी गैरसमज झाला असावा.

- चंद्रजीत राजपूत, तहसीलदार, मालेगाव

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com