Congress Balasaheb Thorat : निळवंडे धरण अन् कालवे आपण पूर्ण केले, आता अनेक..; संगमनेरचे वातावरण बिघडवणाऱ्यांना थोरातांचा थेट इशारा

Balasaheb Thorat Criticizes Ruling Opponents at Sangamner Milk Producers Meeting : संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित झाली.
Congress Balasaheb Thorat
Congress Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat Sangamner speech : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी विरोधकांवर पुन्हा हल्ला चढवला आहे. निळवंडे धरण अन् कालवे आपण पूर्ण केले. मात्र आता अनेक जलदूत पुढे यायला सुरवात झाली आहे, असा टोला लगावताच, संगमनेरमधील बिघडलेल्या राजकीय वातावरणावर थोरातांनी भाष्य केले.

गेल्या वर्षभरापासून संगमनेरमधील वातावरण बदलले आहे. खोट्या केसेस वाढल्या आहेत. अटकपूर्व जामिनासाठी अनेकांना दररोज न्यायालयाच्या घिरट्या घालावा लागत आहेत. आज इतरांना त्रास आहे, उद्या तुम्हालाही होईल, असा थेट इशारा थोरातांनी सत्ताधारी विरोधकांना दिला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "संगमनेर (Sangamner) तालुक्याला सहकाराचे कवच होते. परंतु वर्षापासून तालुक्यात वातावरण बदलले आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी अनेकांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवावा लागत आहेत. परंतु आज इतरांना त्रास आहे, उद्या तुम्हालाही होईल." हे सर्व थांबवण्यासाठी आणि समाज व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जागृत राहा, असे आवाहन थोरात यांनी केले.

'सहकारामुळे बाजारपेठ समृद्ध आहे, असे सांगताना तालुका जपण्यासाठी आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. मात्र आता अनेक जलदूत पुढे यायला सुरूवात झाली आहे,' असा टोला देखील बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) लगावला.

Congress Balasaheb Thorat
Nilesh Lanke news : विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारी नाही, उटल त्यांना..; नीलेश लंकेंकडून झेडपीचं 'प्लॅनिंग' सुरू

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित झाली. दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग घुले उपस्थित होते.

Congress Balasaheb Thorat
ZP president post reserved ST women : 'झेडपी'वर 25 वर्षानंतर एसटी संवर्गातून महिलेला संधी; खुला, ओबीसी वर्गातील इच्छुकांचे स्वप्न भंगले

बाळासाहेब थोरातांनी दुष्काळी ते प्रगतशील तालुका या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाच्या मोठा वाटा असून, तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. दूध संघाची 50 वर्षाकडे होणारी वाटचाल ही मोठी कौतुकास्पद आहे. दूध व्यवसाय सहकार व ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठ फुलली असून, या समृद्धीचा पाया शेतकरी व उत्पादक आहे. तालुक्याची समाज व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहा, असे आवाहन केले.

सहकारी दूध संघामुळे खाजगी संघांवर अंकुश आहे. त्यांना मनमानी करता येत नाही. असे असतानाही सहकारी दूध संघांना अनेक निर्बंध आहेत ते खाजगी संघांना नाही. अनेक ठिकाणी आता बनावट पनीर तयार केले जात आहे. तसेच भाकड गायींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सरकारने सोडवला पाहिजे. आगामी काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन याकरता काम करावे लागणार आहे, असेही थोरात यांनी हटले.

आमदार सत्यजित तांबे आणि रणजीतसिंह देशमुख यांची यावेळी भाषण झाली. आगामी काळात प्रत्येक दूध सोसायट्यांना सोलर प्रकल्पासाठी मदत करणार असून येणारी दिवाळी गोड करणार असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com