Nilesh Lanke news : विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारी नाही, उटल त्यांना..; नीलेश लंकेंकडून झेडपीचं 'प्लॅनिंग' सुरू

Nilesh Lanke No Opportunity for Betrayers in Ahilyanagar Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी पारनेरमधील हंगा इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधत भूमिका मांडली.
Nilesh Lanke news
Nilesh Lanke newsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Zilla Parishad election : विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा पराभव खासदार नीलेश लंके यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो आहे. निवडणुकीत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्याचा चंग आता खासदार लंकेंनी बांधला आहे.

"विधानसभा ज्यांनी गद्दारी केली, त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल, महाविकास आघाडीत बिघाडी झाली तरी, चालेल पण मी बेईमानांना कधीही माफ करणार नाही," असा इशारा खासदार लंके यांनी दिला.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, "काही जण मध्यस्थी घालून चुकलं, माफ करा, असा निरोप पाठवत आहेत. पण निष्ठा ही एकदाच सिध्द करायची गोष्ट असते. माझा स्वाभिमानी कार्यकर्ता दुसऱ्याच्या दारात कधीही गेला नाही." नीलेश लंके प्रतिष्ठानचा परिवार सर्व आव्हानांना तोंड देऊ शकतो, म्हणून आम्हाला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही, असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका (Election) आपण ताकदीने लढवणार आहोत, आणि जिंकणारही आहोत, असे खासदार लंके यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितले की, "आपला विजय निश्चित असला तरी फाजील आत्मविश्वास नको. प्रत्येक मतदारापर्यंत संघटीतपध्दतीने पोहोचा. प्रत्येक बूथ मजबूत करा. कारण मतदार हाच आपला खरा किल्ला आहे." ही लढाई जिंकण्यासाठी आपलीच ताकद पुरेशी आहे, असेही ते म्हणाले.

Nilesh Lanke news
Ahilyanagar Zilla Parishad : विखे, ढेरे, गुंड अन् घुलेनंतर कोण? 'झेडपी'ला सहाव्यांदा महिला अध्यक्ष मिळणार

खासदार लंके यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याची उदाहरणे देत आठवण करून दिली. या छोट्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मॅनेज होणार नाही. परंतु मोठया निवडणुकीत आपण कसा निसटता पराभव पाहिला हे राज्यभर चर्चेत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर गेला. यावरून ईव्हीएम घोटाळयाची गंभीरता लक्षात येते. पण या निवडणुकीत मतपेटीला हात लावता येणार नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीचा थेट फायदा आपल्यालाच मिळेल, असेही ठामपणे सांगितले.

Nilesh Lanke news
Political Horoscope: अजितदादांसाठी आव्हानात्मक काळ; राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह खटल्याचा निकाल लागणार

खासदार लंके यांनी राज्यातील महायुती सरकारवर कडाडून टीका केली. महायुती सरकारवर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाहीत. दुसरीकडे आपल्या एका मेसेजवर हजारो कार्यकर्ते जमतात, आणि बसायलाही जागा उरत नाही. हीच आपली खरी ताकद, हीच आपली संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी हंगा इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधत तीव्र आणि आक्रमक भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीतील अनुभव, ईव्हीएम वाद, गद्दारीचा मुद्दा आणि महायुती सरकारवर हल्लाबोल, अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करत उत्साह भरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com