Balasaheb Thorat Satyajeet Tambe : मामा-भाचे 'अलर्ट'; थोरात-तांबेंची 40 वर्षांची सुसंस्कृत परंपरा जपण्यासाठी 'फिल्डिंग'

Balasaheb Thorat and Satyajeet Tambe Pledge to Uphold Sangamner Cultured Politics : संगमनेरमधील विविध कार्यक्रमांसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे एकत्र आले होते.
Balasaheb Thorat Satyajeet Tambe
Balasaheb Thorat Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Sangamner cultured politics : विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरमधील राजकारणाचं चित्र बदललं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारानं आमदार अमोल खताळ यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे.

थोरात देखील मुरब्बी राजकारणी! त्यामुळे आमदार खताळ समोर जरी असले, तरी खरी लढाई कोणाबरोबर हे थोरातांना माहिती आहे. मंत्रालयातील 40 वर्षांचा अनुभवाचा वापर, आमदार सत्यजीत तांबे यांच्यामागे उभा करत, संगमनेरमधील राजकीय पुर्नबांधणी चालूच ठेवली आहे. यातून संगमनेरच्या 40 वर्षांच्या सुसंस्कृत परंपरा जपण्याचा चंगच बांधला आहे. ही परंपरा खबरा होऊ नये यासाठी मामा-भाचे यांनी अलर्ट आहे, असा इशारा देखील विरोधकांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.

संगमनेर खुर्द इथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे एकत्र आले होते. श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर या प्रवेशद्वारांचं भूमिपूजन, तर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक अन् सभागृह आणि हजरत पीर शाह शिबली चिश्ती शहीद यांच्या सुशोभिकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "संगमनेर शहरात आणि तालुक्यात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण होऊ पाहत आहे. काही मंडळी पैशाच्या जोरावर राजकारणात शिरकाव करत आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असून, ती बदलण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे".

Balasaheb Thorat Satyajeet Tambe
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंचं ‘वन टू का फोर’; मुंबईसाठी माजी नगरसेवकांच्या 'कुमक'ची जुळवाजुळव

'संगमनेर हे छोट्या भारताचे प्रतिरूप आहे. इथं सर्व जातीधर्माचे लोक सलोख्यानं नांदतात. आपल्या राष्ट्राची ओळख असलेला तिरंगा हा विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. त्यातील भगवा, हिरवा, पांढरा आणि निळा रंग हा प्रत्येक घटकाचा सन्मान दर्शवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यात सर्व धर्मियांना समान वागणूक मिळत होती, याकडे बाळासाहेब थोरातांनी लक्ष वेधले.

Balasaheb Thorat Satyajeet Tambe
Prajwal Revanna Rape Case : प्रज्वल रेवण्णा ‘कैदी क्रमांक 15528’; निकालानंतर मौन, तर तुरुंगात रात्रभर जागरण

'‘मराठा’ ही केवळ एका जातीची नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाची ओळख आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आपल्याला अशा महापुरुषांचा विचार अंगीकारत समाजात समता, बंधुता आणि शांततेचा संदेश देणारी संस्कृती टिकवून ठेवावी लागेल. एकेकाळी दंगलींसाठी ओळखले जाणारे संगमनेर आज विकासाचे आणि शांततेचे शहर म्हणून नावारूपाला आले आहे', असेही थोरात यांनी म्हटले.

बाबासाहेब थोरातांनी भारत विविध जातीधर्मांचा देश असून येथे सर्वजण एकत्र नांदत आहेत. मानवता हा आपला खरा धर्म आहे. मात्र काहीजण जातीभेद निर्माण करून समाजात तेढ करत आहेत. अशा विघातक शक्तींना रोखणे आणि तिरंगा, संविधान व देश सर्वोच्च मानणे हीच खरी देशभक्ती आहे, असे म्हटले.

सत्यजीत तांबे यांनी, जनतेच्या आशीर्वादाने मला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. कोणतेही काम मार्गी लावण्याची ताकद आपल्यात आहे. मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत माझे उत्तम संबंध आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने अजिबात काळजी करू नये. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाचे काम तातडीने मार्गी लावण्याची क्षमता आपल्या कार्यसंस्कृतीत आहे. गेली चाळीस वर्षे जपलेली सुसंस्कृत परंपरा आपल्याला जपायची आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत खराब होऊ देणार नाही, असे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com