Sakri Congress News : सद्‍भावना यात्रेतून काँग्रेसने फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

Congress blew the trupet of upcoming election through `sadbhavna` yatra-आगामी निवडणुकीत साक्री तालुक्यात काँग्रेसचाच आमदार असेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
Congress procession at Dhule
Congress procession at DhuleSarkarnama

Dhule Congress News : काँग्रेसच्या सद्‌भावना यात्रेला साक्री शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो कार्यकर्ते, नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या यात्रेचा समारोप सभेने झाला. या वेळी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा निर्धार करीत पक्षाने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (Congress MLA Kunal Patil in active mode for political movement in District)

धुळे शहरात (Dhule) काँग्रेस पक्षाच्या (Congress) सदभावना यात्रेला आमदार कुणाल पाटील (Kunal patil) यांच्या उपस्थितीत काल सुरुवात झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात (BJP) चिंता निर्माण झाली आहे.

Congress procession at Dhule
Dhule Shivsena News : देवेंद्र फडणवीस यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला!

आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत पिंपळनेर येथे सद्‌भावना यात्रा काढण्यात आली. या वेळी साक्री तालुक्यात २०२४ मध्ये काँग्रेसचाच आमदार राहणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

साक्री तालुक्यातील राष्ट्रीय इंडिया काँग्रेसतर्फे सकाळी सातला कुडाशी येथील गणपती मंदिरापासून सद्‌भावना यात्रेला प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. दुपारी दोनला पिंपळनेर येथील साई कृष्णा रिसॉर्टमध्ये आमदार कुणाल पाटील यांनी यात्रेचा समारोप केला.

Congress procession at Dhule
Jalna News | Arjun Khotkar जालन्याकडे रवाना, जरांगे पाटील उपोषण सोडणार ? | Maratha Protest

या वेळी हजारोंच्या संख्येने युवक व नागरिकांनी सहभाग घेतला. आमदार पाटील सद्‌भावना यात्रेत पायी चालले, यात्रेचे आदिवासी भागासह पिंपळनेरला शहरात भव्य स्वागत करण्यात आले. हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्‌भावना यात्रेला प्रारंभ केला. भरपावसात कार्यकर्ते पारंपरिक वाद्य व नृत्यासह वाजतगाजत पदयात्रेचे पिंपळनेरकडे प्रयाण झाले.

Congress procession at Dhule
NCP News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोराला नागरिकांकडून चोप

माजी खासदार बापू चौरे यांच्या निवासस्थानाजवळ स्वागत करण्यात आले. युवा नेते प्रवीण चौरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर, माजी आमदार डी. एस. अहिरे, वसंतराव सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागूल, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, छगन राऊत, सभापती शांताराम कुवर, सत्यशोधक डोंगरभाऊ बागूल, आनंदा सूर्यवंशी यांच्यासह हजारो कार्यकर्ते संवाद यात्रेत सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com