NCP News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोराला नागरिकांकडून चोप

Maharashtra Politics : आजूबाजूचे व्यावसायिक बावस्करांच्या मदतीला धावले. हल्लेखोराला पकडून त्याला चोप देण्यात आला.
 NCP News
NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) बुलढाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून ते जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात जयस्तंभ चौकात हा प्रकार घडला.

तोंड बांधून आलेल्या तिघांनी बावस्कर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. पण सावध असलेल्या बावस्करांनी हल्ला परतवला. त्याच्यासोबतच्या अन्य दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. बावस्करांची याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 NCP News
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट ; पुढील आठवड्यापासून सुनावणी, पुरावे सादर करा..

बावस्कर यांचा इडली-डोसा विक्रीचा व्यवसाय आहे. काल त्यांच्यावर एकाने अचानक रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण बावस्कर सावध असल्यामुळे बचावले. त्यांनी रॉड पकडून हल्लेखोरास जमिनीवर पाडले. तोपर्यंत आजूबाजूचे व्यावसायिक बावस्करांच्या मदतीला धावले. हल्लेखोराला पकडून त्याला चोप देण्यात आला. मात्र त्याचे दोन साथीदार पळून गेले. त्या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो जालना येथील असल्याचे समजते.

 NCP News
Rakhi Jadhav News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेला न्यायालयाचा दणका ; भाजपच्या मंत्र्यांवर केला होता आरोप...

सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या बावस्करांवर हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, जाकीर कुरेशी, सत्तार कुरेशींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com