Nana Patole & Sharad Aher
Nana Patole & Sharad AherSarkarnama

शहराध्यक्ष देखील नसलेली काँग्रेस म्हणते, ‘एकला चलो’

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

नाशिक : शहराला अध्यक्ष नाही, हाताच्या बोटांवर मोजावेत एव्हढे नगरसेवक नाहीत, शहराच्या समस्येवर कधी तोंडही उघडत नाहीत अशी शहर काँग्रेसची (Congress) स्थिती आहे. मात्र आता महापालिका निवडणुका (NMC elections) तोंडावर आल्याने नेत्यांना जाग आली आहे. या नेत्यांनी शहरात `एकला चलो`चा नारा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nana Patole & Sharad Aher
सरकारची निष्क्रियता जनतेसमोर प्रखरतेने मांडा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी उशिराने हालचाल सुरू झालेल्या काँग्रेसकडून पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा देताना महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न झाला. देशात भाजपला काँग्रेस हाच एकमेव पर्याय असू शकतो, असा दावा करताना कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरल्याचा दावा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केला. दरम्यान, स्वबळाचा अहवाल प्रदेश पातळीवर पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nana Patole & Sharad Aher
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

शनिवारी काँग्रेस भवनमध्ये झाली. प्रदेश पातळीवरून निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने बैठक झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीचा आग्रह धरला. स्वबळावर निवडणूक लढल्यास कार्यकर्त्यांना संधी मिळून पक्ष अधिक बळकट होईल असा दावा करण्यात आला.

प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूल थापाला बळी पडत भाजपला सत्ता दिली. परंतु, भ्रष्टाचार, महागाई, धार्मिक तेढ यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात काँग्रेस हाच पर्याय होऊ शकतो. त्यामुळे शहर स्तरापासून बूथ स्तरांवर जनजागरण अभियान, सभासद नोंदणी अभियानाबरोबर भाजपने सत्ता काळात महापालिकेत केलेला भ्रष्टाचार प्रभावीपणे समोर आणण्याच्या सूचना केल्या. निवडणुकीसाठी नियोजन, निवडणूक समन्वय, प्रचार, जाहीरनामा आदी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, सुरेश मारू, राजेंद्र बागूल, शाहू खैरे, हनिफ बशीर, बबलू खैरे, उद्धव पवार, अण्णा पाटील, वत्सला खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. सिराज कोकणी, शैलेश कुटे, राहुल दिवे, सुचिता बच्छाव, अण्णा मोरे, लक्ष्मण धोत्रे, गौरव सोनार, संदीप शर्मा, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष नाथ, गुलजार कोकणी, रऊफ कोकणी, आशा तडवी, समीर कांबळे आदी उपस्थित होते. जयपूर येथे महागाई विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

शरद आहेर कोणत्या पदावर?

प्रदेश स्तरावरील काँग्रेस कार्यकारिणीची नुकतीच फेररचना करण्यात आली. त्यात नाशिकच्या तब्बल बारा जणांना संधी देण्यात आली. यातील अनेकांना आम्ही कधी पाहिलेले नाही, अशी तक्रार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. त्याआधीच शरद आहेर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. तर नुकताच नगरसेवक गुरमितसिंग बग्गा यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी चर्चा होती. मात्र अद्याप तो निर्णय झालेला नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com