Ahilyanagar Politics : काँग्रेसची बूथ लेवलपर्यंत यंत्रणा सज्ज; 'नगर'वर दावा सांगताच, मित्रपक्षांच वाढलं टेन्शन

Congress Claims Ahilyanagar City Assembly Constituency : काँग्रेसचे पक्षनिरीक्षक गुजरातचे आमदार इंद्रविजयसिंह गोहिल यांच्यासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
Ahilyanagar Politics
Ahilyanagar PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : महाविकास आघाडीत अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ नेमका कोणाला यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून घमासान सुरू झालेली दिसते.

यातच काँग्रेस पक्षाचे गुजरातचे आमदार इंद्रविजयसिंह गोहिल नगर दौऱ्यावर असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला. पक्षनिरीक्षख आमदार गोहिल यांनी देखील नगर शहरातून काँग्रेसच लढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षातील इच्छुक अलर्ट झालेत.

काँग्रेस (Congress) आमदार इंद्रविजयसिंह गोहिल यांनी नगर शहरातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर विधानसभेचा आढावा घेतला. नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रशांत दरेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष मोसिम शेख, पदाधिकारी बाळासाहेब भंडारी उपस्थित होते.

Ahilyanagar Politics
Bhanudas Murkute : माजी आमदार मुरकुटेंनी पीडितेला कोण कोणती आमिष दाखवली? आता पोलिस कोठडीत रवानगी

आमदार इंद्रविजयसिंह गोहिल म्हणाले, "राज्यामध्ये आपली महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्षांची समिती मिळून जागा वाटपावर चर्चा राज्यस्तरावर करत आहे. नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद चांगली आहे. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते पक्षाकडे आहेत. लोकांना त्यांच्या प्रश्नांवर लढणारे नेतृत्व नेहमी हवे असते". नगर शहराची विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही आहे. कार्यकर्त्यांनी बूथ लेवलपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवावी. कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत रहावे, असे आमदार गोहिल यांनी केले आहे.

Ahilyanagar Politics
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदेंचा प्रत्येक शाब्दिक वार आमदार पवारांच्या जिव्हारी लागेल असाच; नेमकं काय भाषण केलं?

अनिस चुडीवाला म्हणाले, "नगर शहरात ताबेमारी, गुंडगिरी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारपेठ संकटात आहे. विकास कामे रखडलेली आहेत. मतदारांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींबद्दल मोठी नाराजी आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेसचे मजबूत संघटन उभे असून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची फळी पक्षाने उभी केली आहे. त्यामुळे कोणत्या ही परिस्थितीत ही जागा काँग्रेसकडे घेत उमेदवार देण्याची आग्रही मागणी यावेळी आमदार गोहिल यांच्याकडे केली".

'पोलखोल'मुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटला

किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसने 'विश्वास जुना, आम्हीच पुन्हा' या सत्ताधाऱ्यांच्या दाव्याच्या सुरू केलेल्या पोलखोल मोहिमेमुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटला असल्याचे शहरातील कार्यकर्त्यांनी निरीक्षक आमदार गोहिल यांचे लक्ष वेधलं. काळे यांच्या या मोहिमेचे आमदार गोहिल यांनी कौतुक केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. त्यामुळे सक्षम विरोधक म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत शहरात काँग्रेस राबवत असलेली पोलखोल मोहीम महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com