Nashik News : नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसचं ठरलं; पण भाजपचं अद्यापही भिजत घोंगडं!

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवरुन संभ्रम की नाराजीनाट्य?
Rajendra Vikhe Patil, Hemant Dhatrak, Dhanraj Vispute
Rajendra Vikhe Patil, Hemant Dhatrak, Dhanraj Vispute Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Graduate Election News : लोकसभेपासून अगदी ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व निवडणुकींसाठी भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी करण्यात येत असते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रत्येक घडामोडींवर,निर्णय प्रक्रियेवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन लक्षही ठेवण्यात येते. याउलट चित्र काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळते. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार निश्चित करत भाजपवर कुरघोडी केली असतानाच भाजप (Bjp) अजून कुठेतरी उमेदवाराच्या निवडीवरुन चाचपडताना दिसत आहे.

पदवीधर मतदारसंघात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या मतदारसंघाचा समावेश होतो. यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांना महाविकास आघाडीनं देखील पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसरीकडं भाजपनं आपल्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवरुन संभ्रम आहे की नाराजीनाट्य अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Rajendra Vikhe Patil, Hemant Dhatrak, Dhanraj Vispute
Mahavitaran Strike : महावितरणच्या संपात 'आप' ची उडी ; फडणवीस काय तोडगा काढणार ?

डाँ. राजेंद्र विखेंचं पारडं वरचढ..?

नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांच्यासह भाजपचेच धनराज विसपुते आणि हेमंत धात्रक हे देखील उमेदवारांच्या शर्यतीत आहेत.त्यामुळे भाजपकडून पदवीधरसाठी नेमकं कुणाचं नाव निश्चित केलं जातं याकडे सर्वांचेच लक्ष आहे. यात डाँ. राजेंद्र विखे पाटील यांचं पारडं वरचढ आहे. पण भाजपकडून नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं. ते याही निवडणुकीत वापरलं गेलं तरी निवडणुकीचं समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

Rajendra Vikhe Patil, Hemant Dhatrak, Dhanraj Vispute
Sanjay Raut news: तर, २०२४ मध्ये केसरकरांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी: राऊतांचा थेट इशारा

भाजपसाठी विजय तितकासा सोपा नाही...!

काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेले डॉ. सुधीर तांबे हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. आणि बाळासाहेब थोरात यांचा प्रदीर्घ राजकीय कारकीर्द व अनुभव लक्षात घेता भाजपसाठी या जागेवरील विजय तितकासा सोपा नक्कीच नाही. त्यामुळे तांबे यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून तगडा उमेदवार दिला जाणार यात शंका नाही. आणि यासाठीच डॉ. विखे यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

विखे थोरातांमधला परंपरागत संघर्ष..

थोरात आणि विखे यांच्यामधला संघर्ष आजपर्यंत कधीही लपवून राहिलेला नाही. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्हीही नेते जरी यापूर्वी काँग्रेस पक्षात एकत्र होते तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात कायमच शीतयुध्द सुरु असलेलं पाहायला मिळालं आहे. तसेच काँग्रेस पक्षात असतानाही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी विखे आणि थोरातांनी सोडली नव्हती.

मात्र,2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपली नवीन राजकीय इनिंग सुरु केली. यात सुजय विखे नगरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर विखेंचं राजकीय वजन वाढलं. पण राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली. अन् थोरातांना महसूलमंत्री पद मिळालं. त्यामुळे मधले अडीच वर्ष विखे जास्त सक्रिय नव्हते.पण जून महिन्यातील राज्यात सत्तांतर घडल्यानंतर विखेंच्या पदरात शिंदे फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री पद मिळाले. यामुळे विखेंची ताकद निश्चितच वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com