Sanjay Raut : 'पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा एकदा तुरुंगात जायला तयार आहोत. पण आम्ही तुमच्यासारखे पळकुटे, लफंगे नाही. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. केसरकर हे जर असे बोलले असतील तर 2024 मध्ये त्यांनीदेखील तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी,' अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांना उत्तर दिले आहे.
संजय राऊत हे पुन्हा एकदा तुरुंगात जातील, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर आज संजय राऊत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. याच वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुनही समाचार घेतला आहे. " संभाजी महाराजांच्या अपमानावर जे बोंबा मारणारे शिवाजी महाराजांच्या अपमानावर मूग गिळून का गप्प आहेत? राज्यपालांच्या दारासमोर जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांना माफी मागण्यास का सांगत नाही? दिल्लीतील त्यांचे जे दुसरे प्रवक्ते (सुधांशू त्रिवेदी) आहेत. त्यांनीही महाराजांचा अपमान केला त्यावर ते का बोलत नाही? असंही राऊत विचारलं आहे. आम्हालाही संभाजी महाराजांबद्दल भावना आहेत. पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला. पण त्या महाराजांचाच भाजपच्या लोकांनी अपमान केला. राज्यपालांनी अपमान केला, त्यावर भाजप आणि सध्याचे मुख्यमंत्री का शांत आहेत? असाही संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
शिवशक्ती- भिमशक्ती एकत्र येणार
महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेत सुरु असलेल्या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीला आमच्यात सुरु असलेल्या चर्चेची माहिती अधिकृतपणे दिली आहे. कोणाचा विरोध आहे किंला नाही हे भविष्यात कळेलच. पण, शिवसेना आणि आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित जनता आली तर राज्यात नक्की परिवर्तन घडेल. त्यासाठी प्रकाश आंबेडकर हेदेखील सकारात्मक आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्या राज्यात ज्या प्रकराचे सरकार आहेत ते सरकार उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. 'एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांच्या एकत्र येण्याबद्दल मला माहिती नाही. पण दलित नेते आणि जनता प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असंही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.