Balasaheb Thorat On Mahayuti : महायुतीमधील ओढाताणीतून पालकमंत्री ठरेना; बाळासाहेब थोरातांनी राज्यातील गुंडगिरीचे 'वर्णन' एका शब्दात केले

Congress Balasaheb Thorat Sangamner mahayuti government Guardian Minister law and order situation state Beed : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या पालकमंत्री नियुक्तीसह महाराष्ट्रातील गुंडगिरीवरून सर्वच मुद्यांवर टिप्पणी.
Balasaheb Thorat 2
Balasaheb Thorat 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकार स्थापन होऊन दीड महिना झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिपदाचे वाटप झाले. याला दीड महिना झाला तरी, पालकमंत्र्यांच्या नियुक्ती नाहीत. यामुळे महायुतीत कोठे तरी विस्कळीतपणा दिसतो, असा चिमटा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढला.

तसेच बीडसह राज्यात बिघडलेल्या कायदा-सु्व्यवस्थेचे वर्णन एका शब्दात करताना, सर्व काही भयावह आहे, असे टोला देखील थोरातांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता आले. परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावरून बराच गोंधळ झाला. यातून सत्तास्थापनेचा दावा लांबला गेला. पुढे खातेवाटपाचा आणि मंत्रि‍पदाच्या वाटपाचा गोंधळ कायम राहिला. मंत्रिपद निश्चितीनंतर महायुतीमध्ये रुसवे-फुगवे रंगले. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेले. त्यांचे अजूनपर्यंत नाराजीनाट्य सुरूच आहे.

Balasaheb Thorat 2
Top 10 News: वाल्मिक कराडला पुण्यात कुणी आश्रय दिला? "...तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन : राज ठाकरे - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

मंत्रि‍पदाचे वाटप झाले असले, तरी पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून महायुतीत तणाव सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील मंत्री पालकमंत्री पदासाठी खूपच इच्छुक असून, तसे दावे केले आहेत. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता आहे. यातून पालकमंत्री पदाच्या नियुक्ती लांबल्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी डिवचले. महायुतीत कोठे तरी विस्कळीतपणा दिसतो आहे, ओढाओढी चाललेली दिसते, असा चिमटा थोरातांनी काढला.

Balasaheb Thorat 2
Constitution : संविधानाच्या हस्तलिखिताच्या मूळ प्रती किती? 'त्या' कशा जतन केल्या जातात?

दरम्यान, बीडसह राज्यात बिघडलेल्या कायदा-सु्व्यवस्थेचे वर्णन करताना थोरात यांनी खूपच भयावह आहे. बीडची घटना खूपच गंभीर अन् भयानक आहे. तिथली गुन्हेगारी कुठपर्यंत पोचली आहे, त्याचे पाळेमुळे खणून काढून शासन झाले पाहिजे. वाल्मिक कराड सरेंडर झाला असला, तरी गुंडगिरी संपली, असे होत नाही. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी नष्ट झाली पाहिजे, अशी तिथं मोहीम राबवली गेली पाहिजे, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली.

बीडसह महाराष्ट्रातील गुंडगिरीच्या बाबतीत दहशतमुक्त झाला पाहिजे. राज्यातील गुंडगिरी नष्ट करण्यासाठी सरकारचे प्लॅनिंग हवे. या गुंडगिरीत कुणी असो, ती नष्ट करण्याचे अंतिम उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही बाळासाहेब थोरातांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com