Bachchu Kadu Vs Sanjay Raut : राऊतांना काहीच कसे समजत नाही..! बच्चू कडू म्हणाले, 'त्यांनी सोमय्यांप्रमाणे...'

CM money laundering case : एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रूपये पचवले असतील तर या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची केली होती मागणी.
Sanjay Raut, Bachchu Kadu
Sanjay Raut, Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करतात. खरंतर संजय राऊतांना काहीच कसं समजत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्याकडे आमदार आहेत. लोकसभेत खासदार आहेत. त्यांनी हा प्रश्न तिथे मांडावा. याबाबत लेखी द्यावे. किरीट सोमय्या कागदपत्रे घेऊन मीडियासमोर येतात, तसं करावं, अशी खोचक टीका आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर केली. (Bachchu Kadu Vs Sanjay Raut on CM money laundering case)

कल्याण येथील गोळीबाराच्या घटनेनंतर गोळीबार करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप मीडियासमोर आली आहे. त्यात ते गोळीबाराचे समर्थन करतात, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोट्यावधी रुपये खाल्ल्याचे आरोप करतात. या ऑडिओ क्लिपच्या आधारे शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.

Sanjay Raut, Bachchu Kadu
Bacchu Kadu : 'एखादी गोळी आपल्याच डोक्यात...'; आमदार गोळीबार प्रकरणावर बच्चू कडूंचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रूपये पचवले असतील तर या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. याबाबत नाशिकमध्ये पत्रकारच्या प्रश्नांना उत्तर देताना कडू यांनी राऊतांवर टीका केली. राऊतांना खरंच काही समजतं का नाही, अशी टिप्पणी सुद्धा आमदार कडू यांनी केली. शिवसेनेकडे आमदार आहेत. ते विधानसभा अथवा लोकसभेत हे मुद्दे मांडू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत लेखी तक्रार देऊ शकतात. मात्र, ते मीडियासमोर आरोप करतात. त्यातून काय सिद्ध होणार ? असे गुन्हे दाखल केले जातात का ? असे कडू म्हणाले. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील मीडियावरून आरोप करतात आणि गुन्हे दाखल होतात, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, किरीट सोमय्या मीडियासमोर येताना कागदपत्रे, पुरावे घेऊन बाजू मांडतात. राऊत यांनी सुद्धा असे पुरावे मीडियासमोर आणावेत. फक्त आरोप करून काहीही सिद्ध होणार नाही, अशी टीकाही आमदार कडू यांनी केली.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut, Bachchu Kadu
Vilasrao Jagtap News : विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर ; पाण्यासाठी सर्वपक्षीयांनी दिला 'हा' इशारा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com