Shirish Kotwal Politics: कोतवालांचं भाजपच्या आमदारावर प्रेम उफाळलं; ऐन निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानं निवडणुकीचं गणित बिघडलं!

Congress leader Shirish Kotwal joints BJP blames on NCP and Shivsena UBT local leaders- काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी उलगडले भाजप प्रेमाचे स्वतःचेच गुपित
Shirish Kotwal & Dr Rahul Aher
Shirish Kotwal & Dr Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Chandwad News: नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भाजप विरोधात पॅनल निर्मितीली आमदार शिरीष कोतवाल यांच्या भाजप प्रवेशाने अडथळा निर्माण झाला आहे. निवडणुकीची प्रक्रीया सुरू असतानाच काँग्रेसचे माजी कोतवाल यांनी भाजप प्रवेश केल्याने तो चर्चेचा विषय आहे.

काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी भाजप प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना त्यांचा प्रवेश झाला. काँग्रेससह भाजप विरोधकांना त्याचा मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Shirish Kotwal & Dr Rahul Aher
Yatin Kadam Politics: भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर ठाम; एकाच वेळी भुजबळ आणि शिवसेना शिंदेंशी संपर्क?

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी नुकताच मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. त्यामुळेच पक्षाने भरत टाकेकर आणि रमेश कहांडोळे हे नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. तरीही नगरपालिका निवडणुकीची सूत्रे मात्र माजी आमदार कोतवाल यांच्याकडेच होती.

Shirish Kotwal & Dr Rahul Aher
BJP Yeola Politics: भाजपचे दबावाचे राजकारण की अंतर्गत धुसफुस; एकीकडे भुजबळांशी चर्चा दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल!

चांदवड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी पॅनलची तयारी केली आहे. येथे भाजप स्वबळावर लढणार आहे. स्थितीत माजी आमदार कोतवाल यांच्या निर्णयाने विरोधकांचा पॅनल उभा राहील का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप प्रवेश का केला? त्याचे स्पष्टीकरण माजी आमदार कोतवाल यांनी दिले. ते म्हणाले, भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या विरोधात मी तीन वेळा विधानसभा निवडणूक केली. मात्र त्यांनी कधीही विरोधक म्हणून माझ्यावर राग धरला नाही. ते सतत माझ्याशी अत्यंत सौहार्दाने वागत आले आहेत.

चांदवड तालुक्यात राजकारण करताना अनेक अडचणी आल्या. महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विश्वासार्हता असलेले नेते नाहीत. त्यांच्यात अनेक नेते फुटीर आहे. त्यांच्या भरवशावर कसे राजकारण करणार?, असा प्रश्न त्यांनी केला.

भाजप पक्षात प्रवेश करताना मी कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. मला आता कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा राहिलेली नाही. मात्र आमदार डॉ आहेर यांच्या प्रेमाखातर पक्षप्रवेश केला, असे त्यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com