Balasaheb Thorat And Ramesh Chennithala : शिर्डीत बाळासाहेब थोरातांबरोबर असलेले प्रभारी चेन्नीथला यांच्या भुवया 'या' कारणानं उंचावल्या

Ramesh Chennithala factionalism erupted in Shrirampur Congress : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला शिर्डीत आले असताना, त्यांच्या आणि बाळासाहेब थोरात यांच्यासमोर काँग्रेस श्रीरामपूरमधील गटबाजी उफाळून आली.
Balasaheb Thorat And Ramesh Chennithala
Balasaheb Thorat And Ramesh ChennithalaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात रंग चढू लागला आहे. काँग्रेसमध्ये विसंवाद असला, तरी त्यांनी मतदारसंघात काढलेली संवाद यात्रा चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला साईबाबांच्या दर्शनाला आले होते.

यावेळी त्यांच्या स्वागताला श्रीरामपूर काँग्रेसमधील दोन्ही गट वेगवेगळे आले. श्रीरामपूरमधील आपली संवाद यात्रा थेट शिर्डीमध्ये नेत आपले शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील ही गटबाजी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासमोर उघडी पडली.

काँग्रेसमध्ये (Congress) करण ससाणे, हेमंत ओगले आणि आमदार लहू कानडे, असे उघड-उघड दोन गट पडले आहेत. काँग्रेस श्रीरामपूरमध्ये विसंवाद सुरू असला, तरी दोन्ही गटांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी यात्रा सुरू केली आहे. आमदार कानडे यांनी आत्तापर्यंत 21 गावे व शहरातील काही भाग, तर ससाणे व ओगले यांनी 30 गावे पायाखाली घतली आहेत. यात्रेनिमित्त दोघांनीही नीलेश लंके पॅटर्न अंमलात आणला आहे. आपण केलेल्या विकास कामाच्या शिदोरीवर कानडे मतदारांना सामोरे जात आहे. गावागावात त्यांनी उभी केलेल्या विकास कामांचे फलक लावली आहेत.

Balasaheb Thorat And Ramesh Chennithala
Radhakrishna Vikhe Vs Congress : मंत्री विखेंकडून तीन उड्डाणपुलांचे भूमिपुजन; काँग्रेस, शिवसेनाची राज्याच्या सचिवांकडे तक्रार

दुसरीकडे ससाणे, ओगले यांनी शेतकरी आणि युवकांचे प्रश्न हाती घेत धुरळा उडून दिला आहे. यावेळी सादर केल्या जाणाऱ्या पथनाट्यातून स्थानिक प्रश्नांना हात घातला जात आहे. दोन्ही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असली, तरी अन्य पक्षात मात्र अद्याप शांतता आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महिलांना सुविधा उपलब्ध करून देत चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांनीच ही योजना प्रभावीपणे पुढे नेल्याचे चित्र आहे.

Balasaheb Thorat And Ramesh Chennithala
Sharad Pawar And Shiv Sena Thackeray Party : ठाकरेंच्या 'मशाली'ला पवारांच्या 'तुतारी'चं बळ? शरद पवारांच्या भेटीत काय घडलं...

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हैदराबाद येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांचे शिर्डी (Shirdi) विमानतळावर स्वागत करण्यात आले. माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात हेही यावेळी उपस्थित होते. आमदार लहु कानडे यांनी देखील त्यांचे स्वागत केले. काँग्रेसमधील दोन्ही गटांनी संवाद यात्रेचा सर्व लवाजमा घेऊन शिर्डीत हजेरी लावली. प्रभारींसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी केली. मात्र, यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.

तिकिटाचं कसं बाळासाहेब म्हणतील तसं

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ससाणे आणि कानडे दोन्ही गटांनी आगामी उमेदवारी आपल्यालाच राहील, असे दावे केले आहेत. आमदार कानडे लोकप्रतिनिधी आहेत. हेमंत ओगले उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी ससाणे गटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार कानडे यांचे बाळासाहेब थोरात यांच्याशी सख्य आहे. गेल्यावेळी त्यांनीच कानडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. दुसरीकडे बाळासाहेब सकारात्मक असल्याचा दावा ससाणे गटाने केला आहे. मध्यंतरी दिग्विजय सिंग यांच्या कार्यक्रमात थोरात यांनी उपस्थितांना पक्ष संघटनेवरून कानपिचक्या दिल्या होत्या. त्यामुळे येथील उमेदवारीचा निर्णय तेच घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com