Shrirampur News : काँग्रेस आमदाराची आरटीओ कार्यालयात 'गांधीगिरी'; अधिकारीही झाले 'खजील'!

Congress MLA Hemant Ogale illegal Sand Murum vehicles Shrirampur RTO Ahilyanagar farmer vehicles : काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी आरटीओ कार्यालयात केलेली गांधीगिरी चर्चेत आली असून, अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी व्यक्त केली जात आहे नाराजी.
MLA Hemant Ogale
MLA Hemant OgaleSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar : काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात केलेली गांधीगिरी चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांच्या मालवाहतूक वाहनांवर दंड केल्याने आमदार ओगले यांनी ही 'गांधीगिरी' केली.

"जशी शेतकऱ्यांच्या वाहनावर कारवाई केली, तरी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करा, अवैध मुरूम वाहतूक सुरू असलेल्यांकडे अधिकारी जाणीवपूर्वक कसे कानाडोळा करतात, याची माहिती माझ्याकडे आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना आणि हातावरच्या नागरिकांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही", असा इशारा आमदार ओगले यांनी 'गांधीगिरी' करताना अधिकाऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या एका कंपनीच्या वाहनांवर श्रीरामपूर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नियमाखाली 35 हजार रुपयांचा दंड केला. काँग्रेस (Congress) आमदार हेमंत ओगले यांना याची माहिती मिळताच, त्यांनी युवा नेते करण ससाणे यांच्यासह आरटीओ कार्यालय गाठले.

MLA Hemant Ogale
Top Ten News : जस्टिन ट्रूडोंनी पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा; सुरेश धसांचं आणखी एक खळबळजनक विधान - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

आरटीओ अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेतल्यानंतर आमदार ओगले चांगलेच संतापले. शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना जी तत्परता दाखवली, त्याबद्दल आमदार ओगले यांनी आरटीओ अधिकाऱ्यांचा सत्कार करत 'गांधीगिरी' केली. "सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक, मुरूम वाहतूक सुरू असून त्याच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करता, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. गोरगरीब शेतकरी (Farmer) आणि हातावरच्या नागरिकांना त्रास देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता, कारवाईतील हा दुजाभाव कशासाठी याची देखील कल्पना आहे. परंतु आता या गोष्ट खपवून घेणार नाही", असा इशारा आमदार ओगले यांनी दिला.

MLA Hemant Ogale
Santosh Deshmukh murder case : धारदार कत्तीसह हत्येसाठी वापरली 'ही' नऊ हत्यारं? क्रुरतेचा 'कळस'

आमदार हेमंत ओगले यांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे अवैध वाळू आणि मुरूम वाहतुकीच्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मागणी केली. 'शेतकऱ्यांना त्रास दिला, तर ते खपवून घेणार नाही. अवैधरित्या वाळू व मुरूम वाहतुकीच्या माध्यमातून पैसे कमवणे व त्यातून गुंडगिरी करणे अशा प्रवृत्तींकडे देखील प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे', अशा मागणी आमदार ओगले यांनी केली. आमदार ओगले यांच्या या गांधीगिरीमुळे आरटीओ अधिकारी देखील खजील झाले.

करण ससाणे यांनी जी तत्परता शेतकरी कंपनीच्या वाहनाला दाखवली तर तीच तत्परता आपण विनानंबर असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या ओव्हरलोड वाळूच्या वाहनांबाबत दाखवणार का? असा सवाल केला. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमदार ओगलेंबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुधे हे आरटीओ कार्यालयात उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com