Hiraman Khoskar News : 'क्रॉस व्होटिंग' प्रकरणी चर्चेत आलेले काँग्रेस आमदार खोसकर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला!

Hiraman Khoskar Meet CM Eknath Shinde : ...त्यामुळे आमदार खोसकर हे पर्यायी मार्ग शोधण्यात व्यस्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
Hiraman Khoskar Meet CM Eknath Shinde
Hiraman Khoskar Meet CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Hiraman Khoskar News : क्रॉस व्होटिंग प्रकरणी 'इन्कार' करणारे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अडचणीत सापडले आहेत. गेले काही दिवस त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. तर आता ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला पोहचले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला अहवाल श्रेष्ठींना पाठविला आहे. यातील पाच आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या संदर्भात पाच आमदारांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. त्याचे पत्र तयार करण्यात आले आहे. त्यावर शिस्त पालन समितीच्या अध्यक्ष आणि अन्य सचिवांनी सह्या केल्या आहेत.

हे पत्र पुढील कारवाईसाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. असा दावा इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

Hiraman Khoskar Meet CM Eknath Shinde
Ajit Pawar Nashik Tour : हिरामण खोसकर नावालाच काँग्रेसचे; ते तर राष्ट्रवादीचे आमदार : अजित पवारांनीच गुपीत फोडले

या निर्णयामुळे क्रॉस व्होटिंग करणारे आमदार सावध झाले आहेत. यामध्ये इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर(Hiraman Khoskar) यांचाही समावेश आहे. कालपर्यंत काँग्रेस नेत्यांवर टीका करत क्रॉस व्होटिंगचा 'इन्कार' करणारे खोसकर यांची मुंबईतील बैठकीनंतर 'बॉडी लँग्वेज' बदलली आहे.

त्यामुळे आमदार खोसकर यांच्या भवितव्याबाबत पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर खोसकर यांच्या समर्थक काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांची बाजू मांडत आहेत. दुसरीकडे खोसकर यांचे वर्तन मात्र वेगळाच संदेश देत आहे.

आमदार खोसकर यांची सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेत्यांची अवाजवी जवळीक लपून राहिलेली नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील हिरामण खोसकर आमचेच असा दावा केला होता. सध्या मतदारसंघातील विकास कामांचे कारण सांगत आमदार खोसकर सत्ताधारी पक्षातील जवळपास सर्व नेत्यांची जवळीक ठेवून आहेत.

क्रॉस व्होटिंगच्या चर्चेनंतर त्यात बदल झालेला नाही. शनिवारी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मतदारसंघातील अतिक्रमणे काढण्यासाठी भेट घेतल्याचा दावा केला होता. आज मात्र ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी ठाणे येथील आनंद आश्रमात दिसले.

Hiraman Khoskar Meet CM Eknath Shinde
Vidhan Parishad Election विधान परिषदेच्या मतदानाबाबत काँग्रेसच्या हिरामण खोसकरांनी भूमिका केली स्पष्ट....

त्यामुळे आमदार खोसकर हे पर्यायी मार्ग शोधण्यात व्यस्त असल्याचे स्पष्ट झाले आहेत. काँग्रेस पक्षाने कारवाई केल्यास आमदार खोसकर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पक्षाकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. त्यातून काँग्रेस पक्षाशी गद्दारी केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर मतदार त्यांचा कितपत स्वीकार करतील हा चर्चेचा विषय आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com