Nashik News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आले होते. याशिवाय काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरही आले होते. त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी हिरामण खोसकर हे म्हणायला काँग्रेसचे आहेत, पण ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, असे सूचक विधान केले. त्यामुळे खोसकरही अजित पवार गटात सामील होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे. (Hiraman Khoskar is an MLA of NCP: Ajit Pawar broke the secret)
राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम नाशिकमध्ये आलेल्या पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बहुतांश सर्व आमदार होते. अजित पवार की शरद पवार याबाबत निर्णय न घेतेलल्या सरोज पवार यांनीही स्वागताला येत आपला पाठिंबा अजितदादांना जाहीर करून टाकला.
अजित पवार म्हणाले की, हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे म्हणायला काँग्रेसचे (Congress) आहेत, ते राष्ट्रवादीचेच आहेत. ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आता त्यांचं सगळं बसणं, उठणं आमच्याचसोबत आहे ना. आम्ही एकत्रच काम करत होतो ना. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेईपर्यंत आम्ही एकत्रच काम करत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांचे बांध रेटलेले नाहीत किंवा मारामारी केलेली नाही. त्यामुळे ते आले, त्यांचे स्वागतच आहे. मी आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हे फक्त राष्ट्रवादीचे मंत्री नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. प्रत्येकाचा आदर केलेला पाहिजे.
पत्रकार परिषदेतच दादा भुसेंची एन्ट्री
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे आगमन झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. ‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडलं का. मला उशिर झाला तर मी थेट कार्यक्रमाला येतो, असे निरोपही पवार यांनी दादा भुसे यांना याचवेळी दिला. दरम्यान पालकमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात आम्ही तीन पक्षाचे नेतेमंडळी बसून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी नमूद केले.
मधल्या काळातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली नाही
प्रतिभाकाकीचं काल एक ऑपेरशन झालं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आहे. मला कालच दुपारी जायचं होतं. पण बैठका व इतर कामांमुळे मला जाता आलं नाही. मी सुप्रिया सुळे यांना फोन केला, तेव्हा त्यांनी ‘दादा, तू सिल्व्हर ओक’ला ये, असे सांगितले होते. त्यानुसार मी रात्री साडेआठच्या सुमारास काकी प्रतिभा पवार यांना भेटायला गेला होतो. त्यावेळी त्या ठिकाणी शरद पवार, सुप्रिया सुळे होते. मधल्या काळात घडलेल्या घडामोडींवर त्या भेटीत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.