Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये ‘हाफ डझन’ स्पर्धा; सपकाळ दिल्लीत तळ ठोकून! थोरात-सावंतांसह 6 दिग्गज रिंगणात?

A fierce contest is expected among Congress leaders including Harshwardhan Sapkal, Balasaheb Thorat, and Sachin Sawant for the Maharashtra Legislative Council seat : विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून दिग्गज इच्छुक असून, सर्वाधिक रस्सीखेच हर्षवर्धन सपकाळ अन् बाळासाहेब थोरात यांच्यात असेल, असे सांगितले जात आहे.
Congress MLC Race
Congress MLC RaceSarkarnama
Published on
Updated on

Congress MLC election Maharashtra : विधान परिषद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 12 मेला मतदान होणार आहे. 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकतो.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं असतानाच, महाविकास आघाडीतील इच्छुकांची नावे वेगानं पुढं येऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जागेवर उमेदवार जवळपास निश्चित केला असतानाच, काँग्रेसकडून अर्धा डझनच्यावर इच्छुकांची नावे समोर आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केलं असल्याने काँग्रेसने (Congress) जागेवर दावा सांगण्यात सुरवात केली आहे. यात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सय्यद मुझफ्फर हुसेन, प्रवक्ते सचिन सावंत, राजेश राठोड, हनुमंत पवार यांची नावे चर्चेत आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. त्यामुळे सपकाळ यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या जागेवर काँग्रेसला संधी मिळावी, यासाठी ते हायकमांड यांना साकडं घालणार असल्याचे सांगितलं जात आहे.

Congress MLC Race
Vikhe vs Thorat : थोरात मैदानात उतरताच विखेंचा पलटवार; ‘संगमनेर विसरलात का?’

या जागेसाठी स्वतः सपकाळ इच्छुक असल्याची चर्चा आहे. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे देखील नाव चर्चेत आहे. तसेच प्रवक्ते सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन, राजेश राठोड आणि हनुमंत पवार यांची नावे चर्चेत आहेत.

Congress MLC Race
Rajya Sabha Election : "मुंबईला निघालोय, जयंतरावांना भेटतोय", बाळासाहेब थोरातांचे 'सरकारनामा'शी बोलताना सूचक संकेत; राज्यसभेसाठी 'मातोश्री' ते 'यशोधन' हालचाली!

ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

बाळासाहेब थोरात यांचे नाव राज्यसभेसाठी देखील चर्चेत होते. आता पुन्हा विधान परिषदेसाठी देखील त्यांचे नाव चर्चेत आल्याने, हायकमांड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडे जागेसाठी गळ घालतील, असे दिसते आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीकडे सर्वाधिक आमदार असल्याने आणि महाविकास आघाडीचे नेतृत्वाचा चेहरा असल्याने, ते कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

भाजप फायदा घेऊ शकतो

महाविकास आघाडीतील धुसफूसचा फायदा भाजपने यापूर्वी घेतला आहे. बिहारमध्ये महाविकास आघाडीचे राज्यसभेवर आणखी एक सदस्य गेला असता. पण तिथं मते फोडण्यात, तीपण काँग्रेसची मते फोडण्यात भाजपला यश आले. विशेष म्हणजे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कामगिरी पार पाडली होती. विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला गहाळ राहून चालणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com