Congress News : काँग्रेसच्या गोटात हालचालीना वेग; स्वबळावर लढण्याची चाचपणी

MVA Political News : राज्यात काँग्रेसला महाराष्ट्रात एकूण 13 जागांवर विजय मिळवला तर त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला 8 जागा जिंकता आल्या.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. त्यामुळे आघाडीचा उत्साह दुणावला आहे. विशेषतः या निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या.

राज्यात काँग्रेसला महाराष्ट्रात एकूण 13 जागांवर विजय मिळवला तर त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला 8 जागा जिंकता आल्या. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूककीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली असल्याचे समजते. (Congress News0

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. या निवडणुकीत मात्र त्यांनी मोठे यश मिळवले आहे. राज्यात 17 जागा लढताना 13 जागी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) चांगलं यश आलं. विशेष म्हणजे काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचे समजते. त्यामुळेच काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे.

येत्या निवडणुकीत काँग्रेस जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व 11 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस पक्षातर्फे जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पाहिजे तशा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीसोबत, अन्यथा पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघाच्या जागा काँग्रेस स्वबळावर लढण्याची चाचपणी काँग्रेसकडून केली जात आहे.

Congress News
Video Anil Parab News : पदवीधर निवडणुकीच्या मतदारयादीत गोंधळ; अनिल परबांच्या मुलींसह अनेकांचे फॉर्म झाले रिजेक्ट

जळगावात काँग्रेस भवनमध्ये तातडीची बैठक

जळगाव जिल्ह्यात काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभेसाठी इच्छुकांनी जळगावच्या काँग्रेस भवन कार्यालयात गुरुवारपासून अहवाल सादर करण्यास सुरुवात केली आहे. सात दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांची नावे आणि अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्याच्या सूचना तालुका निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची जळगावात काँग्रेस भवनमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली.

उमेदवारांची चाचपणी सुरू

काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सात दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांची नावे आणि अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करावा, अशा सूचना तालुका निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. सर्व निरीक्षक आणि अध्यक्षांना मतदार याद्या, नमुना फॉर्म देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत निरीक्षकांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Congress News
Congress Agitation Vs BJP : काँग्रेस महायुती सरकारविरोधात 'चिखल फेको' आंदोलन करणार!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com