Nashik Congress News : काँग्रेसने सुरू केली निवडणुकीची तयारी!

नाशिक शहरातील सर्व विभागांत संघटनात्मक विस्तारासाठी नियुक्त केले पक्षाचे प्रभारी.
Dr. Subhash Deore, Sandeep Sharma, Rajendra Bagul & Ulhas Satbhai
Dr. Subhash Deore, Sandeep Sharma, Rajendra Bagul & Ulhas SatbhaiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : सातत्याने वाद विवादात अडकलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आता जुन्या जाणत्या माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षकार्यात सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (Congress will reorganise party`s Loyal spporters for expand organisation in Nashik)

नाशिक (Nashik) शहर काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामकाजात सक्रीय करण्यात आला आहे. यासंदर्भात लोकसभा (Elections) तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे.

Dr. Subhash Deore, Sandeep Sharma, Rajendra Bagul & Ulhas Satbhai
BJP New Appointments : लोकसभेआधीच भाजपने भाकरी फिरवली!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीला प्राधान्य देण्यात येत आहे.

आगामी निवडणुकीसाठी सांभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सर्व ब्लॉकमध्ये बैठका घेण्यासाठी जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे, शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी शहरातील पाचही ब्लॉकमध्ये प्रभारी नियुक्त केले आहेत.

Dr. Subhash Deore, Sandeep Sharma, Rajendra Bagul & Ulhas Satbhai
OBC Issue : `इंडीया`च्या भूमिकेने छगन भुजबळांची राजकीय कोंडी?

काँग्रेसच्या (मध्य) प्रभारीपदी नंदकुमार कर्डक, माजी सभागृहनेते राजेंद्र बागुल (नवीन नाशिक), जेष्ठ नेते उल्हास सातभाई (पंचवटी), युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीप शर्मा (सातपूर), आणि माजी सभागृह नेते डॉ. सुभाष देवरे (नाशिक रोड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com