BJP New Appointments : लोकसभेआधीच भाजपने भाकरी फिरवली!

भाजपने उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदांवर नवे पदाधिकारी नियुक्त केले.
Prashant Jadhav & Prof. Sunil Bachhav
Prashant Jadhav & Prof. Sunil BachhavSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सायंकाळी या राज्यभरातील शहर व जिल्हाध्यक्षांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहे. यानिमित्ताने त्यांनी लोकसभा निवडणुकीवर पक्षाचा पुर्ण फोकस असल्याचे संकेत दिले असुन नव्या पदाधिकाऱ्यांना जनतेत जाऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. (BJP made all new appointments in the state)

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी गेले चार महिने रखडलेल्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नाशिक (Nashik) विभागात तेरा नवे शहर व जिल्हा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

Prashant Jadhav & Prof. Sunil Bachhav
Shivsena on Kirit Somaiya: किरीट सोमय्यांचे खरे चरीत्र समाजापुढे आले!

भाजपचे नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे आणि जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्या नियुक्तीबाबत गेले चार महिन्यांपासून बदलाचे वारे होते. त्याबाबत पक्षाकडून चाचपणी करण्यात आली होती. त्यात श्री. आहेर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अन्य पदाधिकाऱ्यांना देखील नव्या नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नवनियुक्त शहर व जिल्हा अध्यक्ष असे, प्रशांत जाधव (नाशिक शहर), प्रा. सुनिल बच्छाव (नाशिक ग्रामीण), शंकर वाघ (नाशिक-दिंडोरी), निलेश कचवे (मालेगाव), सौ. उज्ज्वलाताई बेंडाळे (जळगाव शहर), ज्ञानेश्वर जळकेकर (जळगाव ग्रामीण), अमोल जावळे (जळगाव, रावेर), अभय आगरकर (नगर शहर), विठ्ठलराव लंघे (नगर- उत्तर), दिलीप भालसिंग (नगर-दक्षिण), निलेश माळी (नंदुरबार), गजेंद्र अंपाळकर (धुळे शहर) आणि बबनराव चौधरी (धुळे ग्रामीण)

Prashant Jadhav & Prof. Sunil Bachhav
Suraj Chavhan यांचा Sadabhau Khot यांच्यावर हल्लाबोल | Sharad Pawar | Ajit Pawa | Sarkarnama

राज्यातील सर्व शहर व जिल्हा अध्यक्षपदांवर नव्याने नियुक्त्या करम्यात आल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांना कोअर टीमच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे काम करायचे आहे. त्यात बुथ कमिट्या प्रमुख आहेत. त्याबाबत आधीच बुथस्तरावर बांधणी करण्यात आलेली असल्याने नवे पदाधिकारी वरीष्ठांच्या सहयोगाने या निवडणुकीची तयारी करणार आहेत. येत्या महिन्याभरात कार्यकारीणी सदस्य व अन्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील असे सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com