Congress Nashik News : पटोले आमदार खोसकरांवर बरसले, पण पदाधिकाऱ्यांना का विसरले?

Nana Patole forget to take on Nashik leaders- काँग्रेसच्या विभागीय शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निष्क्रीय पदाधिकाऱ्यांबाबत काहीच बोलले नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार हिरामण खोसकर यांना खडसावले. मात्र प्रदेश समितीवर नाशिकचे बारा पदाधिकारी महत्त्वाची पदे भूषवीत आहेत. मात्र यातील एकही पदाधिकारी चुकूनही भाजप किंव त्यांच्या विरोधकांवर टिका करण्यासाठी कधीही तोंड उघडत नाही. (There are 12 office bearers on State committee of Congress)

महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश काँग्रेसचे (congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाच्या आमदारांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. मात्र असे करताना त्यांचे पदाधिकारी भाजप (BJP) विरोधात शब्दही उच्चारत नाहीत, याचा त्यांना विसर पडला.

Nana Patole
Supriya Sule News : सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या, "निवडणुकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ, मात्र...

नाशिक शहर असे एकमेव शहर असावे, जीथे थोडे नव्हे तर चक्क बारा नेते काँग्रेसच्या राज्य कार्यकारीणीवर अत्यंत महत्त्वाची पदे भूषवित आहेत. यातील एकाही पदाधिकाऱ्यांनी शहराच्या, जनतेच्या किंवा अगदी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप अथवा सत्ताधारी गटाने काहीही, कितीही टिका केली, तरी ते कधी प्रत्युत्तर देत नाहीत.

प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्य, सरचिटणीस, उपाध्यक्ष आदी विविध पदांवर कार्यरत पदाधिकारी स्थानिक राजकारणात फारसा प्रभाव दाखवू शकलेले नाही. यातील कोणताही पदाधिकारी सत्ताधारी नेते, मंत्रीच काय अगदी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर देखील टिका करताना, प्रतिक्रीया दिल्याचे नागरिकांना आठवत नाही. त्यामुळे हा पक्ष देखील निष्क्रीय असल्याची चर्चा आहे.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आमदार खोसकर यांना समज दिली, तसाच काहीसा सल्ला त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला असता तर बेर झाले असते. पक्षाचे काही पदाधिकाऱ्यांनी चक्क शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचे फलक लावले होते. यातून मतदारांनी काय बोध घ्यावा अशी चर्चा रंगली आहे.

Nana Patole
Nagar Politics : नगर नव्हे अहिल्यानगर; सुळेंचा दौरा अन् प्राजक्त तनपुरेंच्या ट्विटची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com