Dhule Congress: दुष्काळग्रस्तांसाठी काँग्रेसचा सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम!

Congress went aggressive in dhule to help the drought stricken farmers-काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्‍नावर शासानाचे लक्ष वेधत अग्रीम मदत देण्याची मागणी केली.
Congress delegation at Dhule
Congress delegation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Cogress News : धुळे जिल्ह्यासह परिसरात तीव्र दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. पीके करपली आहेत. त्यामुळे त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अग्रीम मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Congress deemands advance relief to farmers in Dhule district)

धुळे (Dhule) जिल्हा काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी दुष्काळाची स्थिती असल्याने त्यांना शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.

Congress delegation at Dhule
Nashik Politics : शरद पवारांच्या दौऱ्यात दिसला जि. प. इच्छुकांतील राजकीय गुंता!

आमदार कुणाल पाटील, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी एकमुखाने दुष्काळ जाहीर करण्याची, पीकविम्याच्या अग्रिम रकमेसाठी शासनाने जीआर काढण्याची मागणी केली.

यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलक घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम आमदार पाटील यांनी दिला.

Congress delegation at Dhule
Sanjay Raut यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल | Delhi Press |

दोन दिवसांत जीआर निघाला नाही तर जनआंदोलन छेडू, असा इशारा आमदारांसह आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिला. बीड आणि जळगाव जिल्ह्यात राज्य शासनाने पीकविम्याच्या अग्रिम रकमेबाबत घोषणा केली; परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहीर करणे आणि पीकविम्याच्या अग्रिम रकमेबाबत समन्यायी भूमिका घेत नसल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com