Nashik Politics : शरद पवारांच्या दौऱ्यात दिसला जि. प. इच्छुकांतील राजकीय गुंता!

Political rift in Nashik district politics due to Shivsena & NCP split-शिवसेना व राष्ट्रवादी फुटीने जिल्ह्यात इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Nashik ZP Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कोणत्या गटाकडून निवडणूक लढवावी, असा प्रश्न इच्छुकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक नेते सध्या कुंपनावर बसून योग्य संधीची वाट पहात आहेत. शरद पवार व अन्य नेत्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे चित्र प्रकर्षाने पुढे आले. (There is a big confusion with willing candidates of ZP)

राज्याच्या (Maharashtra) राजकारणात गेल्या काही महिन्यांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन पक्षांत फूट पडल्याने नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले आहेत.

Sharad Pawar
Eknath Khadse News : खडसे यांनी लावले देवेंद्र फडणवीसांचे `ते` व्हिडीओ!

राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे होत असलेल्या फलकबाजीत अनेक माजी सदस्य आघाडीवर दिसत आहेत. ‘राष्ट्रवादी’त उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेलेले खासगीत शरद पवार हेच आमचे दैवत आहेत, असे सांगतात. दुसरीकडे निवडणुका लांबणीवर पडत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या इच्छुकांपुढे राजकीय गुंता वाढणार आहे.

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. गत पाच वर्षांत सर्वपक्षीय व महाविकास आघाडीची सत्ता राहिली. यंदा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत येईल, अशीच परिस्थिती राहील, असे वाटत असतानाच राज्यातील सत्तानाट्यात अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Maratha Reservation : बीडकरांचे बंधुत्त्व ; मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तातील पोलिसांचा केला पाहुणचार

गत पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ सदस्य निवडून आले होते. यातील जिल्हा परिषदेचे बहुतांश माजी सदस्य हे अजित पवार व छगन भुजबळ यांच्याबरोबर असल्याचे जाहीर सांगत असले, तरी खासगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगतात. काहींनी उघडपणे शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे. एक वर्षापूर्वी शिवसेनेतही दोन गट पडले.

या फुटीनंतर शिवसेनेचेही माजी सदस्य दोन्ही गटांत विखुरले गेले आहेत. गत पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले होते. यातील बहुतांश सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे. काहींनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांनी गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देत ते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत.

Sharad Pawar
Maratha Andolan: गृहमंत्री फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, हाच पर्याय!

शिवसेना असो वा राष्ट्रवादी. दोन गट झाल्याने पक्षांची ताकद दोन गटांत विभागली गेल्याने सदस्य संख्येवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेवर सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने भाजपने राज्यात सत्तेत आल्यापासूनच आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com