Yeola Congress News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाविषयी सार्वत्रीक नापसंतीची पावती आहे. भाजपाचा पराभव आणि मतदारांची नाराजी ही देशातील आगामी परिवर्तनाची नांदी असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख यांनी दिली. (Congress followers celebrate Congress victory in Karnataka election)
कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे हा भाजपचा (BJP) केंद्रातील सरकारच्या (Centre Government) विरोधातील लोकांचा असंतोष असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात निफाड, वणी, सटाणा, नाशिक रोड यांसह विविध शहरांत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
येवला तालुका व शहर कॉंग्रेसतर्फे कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या स्पष्ट बहुमताचा येथील विंचूर चौफुलीवर विजयोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला निराधार व निराश्रित काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोधंळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाके वाजवून, पेढे वाटून व हालकडीच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. ‘कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२४ पैकी १३६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. कर्नाटकमधील विजय हा लोकशाहीचा विजय आहे, देशांमधील परिवर्तनाची ही नांदी आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश खळे, बळीराम शिंदे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी, तालुका सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, भाऊराव दाभाडे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, मुकेश पाटोदकर, राजेंद्र गणोरे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, झेड.डब्ल्यू.ताडगे, अशोक नागपुरे, अशोक ठोंबरे, आबासाहेब शिंदे, रावजी पाबळे, संजय मढवई, संजय गोंधळी, अशोक साताळकर, आप्पा सावंत, कैलास भोरकड, गणेश निकम, साई मढवई, राजवीर शिंदे, पीयूष थोरात, शिवेंद्रादित्य देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
वणी येथे कॉंग्रेसतर्फे पेढे वाटप
कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर वणी येथे स्थानिक कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिषबाजी करीत व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रीय कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत प्राप्त करीत सत्ताधारी भाजपाचा दारूण पराभव केल्याने येथील भाजीमंडई चौकात कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्याची आतिषबाजी करून नागरिकांना पेढे वाटण्यात आले. कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन महाले, शहराध्यक्ष बंटी सैय्यद, तालुका आदिवासी आघाडी प्रमुख दशरथ महाले, बब्बूभाई शेख, सुनील समदडिया, शौकत मणियार, दत्तू कोरडे, किशोर साखला, भरत गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.