भुसावळ : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन कामाला लागावे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी, तसेच निवडणुकांमध्ये काँग्रेसचा (Congress) झेंडा फडकवा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Pradeep Pawar) यांनी केले.
शहरातील माता यशोधरानगरमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष प्रदीप पवार यांचा भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार झाला. त्यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
प्रारंभी प्रदीप पवार यांनी दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले. जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे प्रशासकीय सरचिटणीस जमील शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव राहुल मोरे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, माजी जिल्हाध्यक्ष के. बी. काझी, वरणगावचे शहराध्यक्ष अश्पाक काझी, युवक काँग्रेसचे इम्रान खान, यावलचे शहराध्यक्ष कदीरभाई, उपाध्यक्ष नितीन पटाव, इस्माईल गवळी, रहीम कुरेशी, गफूर गवळी, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जवरे, उपाध्यक्ष विनोद पवार, सागर कुरेशी, सुरेश टाक, कुणाल सुरळकर, मुकेश सपकाळे, राजू सपकाळे, काशीनाथ जाधव, प्रताप इंगळे, शैलेश बोदवडे, रवी पाटील, राजू पालीमकर, प्रा. मनोज देशमुख, प्रकाश मोरे, महिला तालुकाध्यक्ष कल्पना तायडे, कांचन नरवाडे, सारिका शिरसाठ, वॉर्डातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. विवेक नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. संभाजी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जवरे यांनी आभार मानले.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.