संविधान हीच आपली ओळख; तिच्या अस्मितेचे संवर्धन व्हावे

प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या उपस्थितीत विद्रोही साहित्य संमेलनात रंगली गटचर्चा
Prin. Dr V. B. Gaikwad
Prin. Dr V. B. GaikwadSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विद्रोही साहित्य संमेलनात गटचर्चा होणे चांगलेच. कारण या चर्चा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचतात. भारतीय संविधान हीच आपली ओळख आहे. तिचे संवर्धन होणे ही गरज असून, ती पहिलीपासून अभ्यासक्रमात हवी, असे मत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड (Dr. V. B. Gaikwad) यांनी केले.

Prin. Dr V. B. Gaikwad
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

गंगापूर रोडवरील मविप्रच्या शिक्षण संस्थेच्या आवारात शनिवार पासून सुरू असलेल्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात १४ विषयांवर गटचर्चेचे आयोजन केले होते. चर्चेत सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत संविधानापासून ते शेतकरी आंदोलनापर्यंतचा मागोवा घेत आपणही जागृत असल्याचे दाखवत समाजाला काय हवे, काय नको याबाबत मते स्पष्ट केली.

Prin. Dr V. B. Gaikwad
गिरीश महाजनांनी महाविकास आघाडी बाबत शाब्दीक खेळ बंद करावेत!

भारताचे संविधान व नवे कृषी कायदे, शेतकरी आंदोलन : नवी दिशा, संविधान व कामगार कायदे, संविधान संस्कृती व कामगार कायदे, सांस्कृतिक दहशतवाद, नागरिकत्वाचा प्रश्‍न, जल, जंगल, जमीन व आदिवासींचे हक्क, ‘ते’ संविधान जाळतात अन् आम्ही बोलू नये, अंधश्रद्धा, जातपंचायतविरोधी लढा अन् प्रबोधन, बाईचं जिणं अन् मराठी साहित्य, भटक्या विमुक्तांचे जगणे अन् मरणे, कोरोनानंतरचे नवे शैक्षणिक धोरण, कोरोनानंतरचे जग, महिला आरक्षणाच्या भिजत घोंगड्याची पंचविशी आदी विषयावर या गटचर्चा रंगल्या. ‘अंनिस’चे अविनाश पाटील या सत्राचे अध्यक्ष, तर प्राचार्य डॉ. गायकवाड तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन आदी प्रमुख पाहुणे होते.

गटचर्चेत शेतमजुरांपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध प्रश्‍न जाणून घेतले. चर्चेतून शेतपिकाचा हमीभाव मिळावा, ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे घटत्या नोकऱ्यांचा प्रश्‍न, समाजावरील सांस्कृतिक आक्रमण व कुनीती, आदिवासींचे प्रश्‍न, संविधानाची हेळसांड, जातपंचायतीविरोधी लढा, महिला आरक्षण, देशातील १५ कोटी भटक्यांचे जगणे, कोरोना उद्रेकानंतर शिक्षणाची झालेली हेळसांड, कोरोनामुळे झालेले मृत्यू व त्याअनुषंगाने उपस्थित झालेले प्रश्‍न, जल, जंगलावरील आदिवासींचे संविधानिक हक्क आदी प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात आला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com