ठेकेदार म्हणतो, आधी पेमेंट द्या, मग ‘ब्लॅकलिस्ट’ करा!

महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर अनिल नागमोते यांच्या उपस्थितीत धुळे महापालिकेत आढावा बैठक झाली.
Mayor Pradeep Karpe in Dhule corporation meeting
Mayor Pradeep Karpe in Dhule corporation meetingSarkarnama
Published on
Updated on

धुळे : देवपूर (Dhule) भागातील भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रश्‍नावर संबंधित नगरसेवकांनी संताप व्यक्त करत ठेकेदार, एमजेपीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यापर्यंत भावना व्यक्त केल्या. या संतापानंतर ठेकेदाराने थेट ब्लॅकलिस्ट करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. शिवाय थकीत बिल दिल्याशिवाय काम सुरू न करण्याचेही ठेकेदाराने बोलून दाखविले. (Dhule corporator unhappy with MJP contractor)

Mayor Pradeep Karpe in Dhule corporation meeting
खासदार हेमंत गोडसे राजीनामा द्या; पुन्हा निवडून येऊन दाखवा!

या पार्श्वभूमीवर वरचढ ठेकेदार लोकसेवक व अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही, त्यांचा ठेकेदाराला धाक नसल्याचे गंभीर चित्र समोर आले. देवपूर भागातील भूमिगत गटार योजना व अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आढावा बैठक बुधवारी (ता.२०) मनपा आयुक्त दालनात झाली. महापौर प्रदीप कर्पे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर अनिल नागमोते, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, महिला बालकल्याण समिती सभापती योगिता बागूल, उपसभापती आरती पवार, आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त संगीता नांदूरकर, अभियंता कैलास शिंदे, एमजेपीचे अधीक्षक अभियंता निकम, उपअभियंता डी. डी. पाटील, श्री. वानखेडे, ठेकेदाराचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Mayor Pradeep Karpe in Dhule corporation meeting
ओबीसी आरक्षण; महाविकासचे ९९ तर फडणवीसांचे १ टक्का योगदान!

रस्ते दुरुस्ती तरतूद नाही

भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम व रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट काम या विषयावरून विरोधी पक्षनेते श्री. देवरे, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी संताप व्यक्त केला. रस्ते दुरुस्तीबाबतच्या प्रश्‍नावर जेवढे काम झाले, त्यापेक्षा जास्त कामाची तरतूद नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. शिवाय माझे उर्वरित बिल मिळत नाही तोपर्यंत योजनेचे पुढचे काम सुरू न करण्याची भूमिकाही ठेकेदाराने बोलून दाखविली. ही बाब विरोधी पक्षनेते देवरे यांनी एमजेपी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. दरम्यान, रस्ते दुरुस्तीच्या प्रश्‍नावर पुढील आठ दिवसात आवश्‍यक निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.

पाणी योजना दिवाळीपर्यंत

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कोणत्याही स्थितीत दिवाळीपर्यंत पूर्ण करावी. या कामात कुचराई सहन केली जाणार नाही, असे महापौर कर्पे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. माजी उपमहापौर भगवान गवळी, नगरसेवक हिरामण गवळी, सुभाष जगताप, नगरसेविका भारती माळी, वंदना भामरे, ओव्हरसियर सी. एम. उगले, प्रदीप चव्हाण, एन. के. बागूल आदी उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com