नाशिक : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड करीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला. त्याच्या बातम्या फेसबुक व समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. त्यावर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. अनेकांनी त्यांना तुम्ही `माजी खासदार` झालात, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे थेट आव्हान दिले. त्यामुळे या पोस्ट चांगल्याच चर्चेचा विषय ठरल्या. ( People said we vote as Shivsena for Hemant Godse, not as Shinde)
खासदार हेमंत गोडसे यांच्या मोजक्या व सतत पाठराखण करणाऱ्या निकटवर्तीयांनी त्यांचे समर्थन करीत `तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण` यांसह बातम्या फेसबुक व समाज माध्यमांवर टाकल्या आहेत. या पोस्टसह खासदार गोडसे यांच्या बंडाच्या बातम्यांवर नेटकऱ्यांनी अक्षरशः संताप व्यक्त करीत तिखट प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
यामध्ये एका शिवसेना कार्यकर्त्याने, खासदार फुटतील, आमदार फुटतील, फुटतील नगरसेवक, पण कुणाच्या बापात हिम्मत नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक फोडायची. मनोहर उगले म्हणाले, जनतेने आता तरी समजून घ्यावे की नेत्यांना पक्ष, निष्ठावंत, ध्येय असं काहीच नसतं. असतो तो फक्त राजकीय स्वार्थ. कट्टर असतात, फुटत नाहीत, अविरत लढतात ते फक्त इमानदार कार्यकर्ते. त्यामुळे खासदार गोडसे यांनी राजीनामा देऊन परत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान अनेक नेटकऱ्यांनी दिले आहे.
तुमचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे आले नव्हते. तळागाळातील शिवसेना कार्यकर्ते होते. उन्हातान्हात त्यांनी प्रचार केला. आजपर्यंत तुमचा चहा देखील घेतलेला नाही. तुमच्याकडून कुठले काम करून घेतलेले नाही. तुम्ही कधी कोणाच्या कामी देखील आलेले नाही. कुठल्या कार्यक्रमात दहा कार्यकर्ते आणलेले नाहीत. तुम्हाला सगळं रेडीमेड भेटलेलं आहे. तुम्हाला ही संधी होती. पण ही शेवटची संधी तुम्ही सोडली. जे म्हणतात, `तुम्ही बांधाल ते तोरण` ते फक्त फेसबुक पुरतेच आहेत. ते तुम्हाला फक्त फेसबुकवरच खासदार करू शकतात. जाहीर निषेध. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.